सुरगाणा येथे उपजिल्हा रुग्णालयाची मागणी
सुरगाणा: सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धित होऊन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होण्याची मागणी आज सुरगाणा तालुका दौऱ्यावर आलेल्या मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुरगाणा येथील नगरसेवक भगवान आहेर यांच्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. आमच्या तालुक्यात आरोग्य सोई सुविधाचा अभाव असल्याने तालुक्यातील बरेचसे रुग्ण हे पुढील उपचारासाठी नाशिक व गुजरात मधील वासदा, धरमपूर, वलसाड, अहवा येथे जात असतात. त्यामुळे सुरगाणा येथे लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून येथील नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी विनंती करण्यात आली. तसेच सुरगाणा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, रस्ते तसेच विविध विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जनजातीय संपर्कप्रमुख पश्चिम महाराष्ट्र देविदास चौधरी तसेच मानव विकास परिषद सुरगाणा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ थोरात, मधुकर चोथवा सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या