Advertisement

कांद्री निवासी कु.कल्याणी सरोदे भारत गौरव पुरस्कारा ने सन्मानित

कांद्री निवासी कु.कल्याणी सरोदे भारत गौरव पुरस्कारा ने सन्मानित

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – जागतिक मानवाधिकार भारत गौरव फाऊंडेशन आणि ग्लोबल अजय मेस्राम वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील सुरेश भट्ट सभागृहात सोमवार (दि.१२) डिसेंबर भारत गौरव पुरस्कार शो घेण्यात आला .

जन्मभूमी टाइमचे संपादक सुरेंद्र गजभिये , ब्रजेश डहरवाल , मोहशीन जफर साहेब , ताजुद्दीन बाबा यांच्या हस्ते हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . जागतिक मानवाधिकार भारत गौरव सन्मान फाऊंडेशनचे संचालक राजिक खान यांनी सर्व धर्मांना एकत्र आणून भारताचा अभिमान वाढविण्याविषयी सांगितले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजा मुधोजी भोसले वेदप्रकाश ओझा उपस्थित होते. या अवॉर्ड शो मध्ये, नागपूर जिल्हायातील कांद्री- कन्हान गावात राहणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट कु.कल्याणी सरोदे यांना भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . कल्याणी सरोदे‌‌ यांना नुकताच चित्रपट मालिकेतील तिच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्टचा पुरस्कार मिळाला होता . एका छोट्या गावातील रहिवासी असून उद्योगांत आपली छाप सोडली .‌‌

या सोबतच सोनू सूद, जस्मिन भसीन, प्रार्थना बेहेरे , राहुल वैद्य , राखी सावंत , आजमा फाला , रोशनी कपूर , रुपाली गांगुली , गोल्डन बॉईज यांच्याकडून‌ सुध्दा पुरस्कार मिळाले आहे . सनी , कार्तिकी गायकवाड अदा‌ खान, हिना खान , कुलकम उस , आसनूर कोरली , गोनी शिवांगी , जोशी सोनवणे यांच्या हस्ते देखील कलाकार सन्मान मिळाला आहे . यात आपली प्रतिभा दाखवली आहे .

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजा मुधोजी भोसले , वेदप्रकाश ओजा भारताचे आयुर्वेदिक स्वदेशी अध्यक्ष जगातील सर्वात लहान महिला ज्योती अंबे, गगन मलिक अभिनेता आणि बुद्ध धम्म प्रचारक गगन मलिक , नरेंद्र मोदी विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी चाणक्य , विकास महाजन अभिनेता, विकास महाजन गायक मशीन खान आदी मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या