Advertisement

जिल्हा परिषद बामणी शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

जिल्हा परिषद बामणी शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

3 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत जागतिक दिव्यांग दिन सप्ताहाचे औचित्य साधून मा. गटशिक्षणाधिकारी ए. चिलबूलेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी येथे विद्यार्थ्यांमध्ये समता व समानता प्रस्थापित होण्याच्या उद्देशाने तसेच दिव्यांग व इतर विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. सी. गावंडे, सहायक शिक्षक श्री. अशोक नरूले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. मंगेश गजबे, श्री. श्रावणजी देवाळे शाळा व्यवस्थापन सदस्य तसेच गट साधन केंद्र नागभीड येथील समावेशित शिक्षण तज्ञ कु. छाया आर. विंचूरकर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना सदर दिवसाविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना दिव्यांग क्षेत्रातील जगात नावलौकीक असलेल्या उच्च विभूतीची ओळख करून दिली. यात ब्रेल लिपीचे जनक डॉ. लुईस ब्रेल, तसेच डॉ. हेलन केलर यांची ओळख करून दिली. सदर कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांकरीता चित्रकला स्पर्धा व शुद्ध लेखन स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. सदर कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग समावेशित शिक्षण व शाळेमार्फत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गावंडे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. ए. नरुले सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या