Advertisement

देशाच्या आर्थिक विकासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्वपूर्ण - प्रा.कविता भोये

देशाच्या आर्थिक विकासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्वपूर्ण – प्रा.कविता भोये

सुरगाणा: सुरगाणा महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी अर्थशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार या विषयावर प्रा. कविता भोये यांचे व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.जी. दिघावकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी मंगलदास वाघमारे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यावर आपले मत मांडले. व्याख्यात्या प्रा. कविता भोये म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारण, तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले .देशाच्या विविध क्षेत्रात केलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही म्हणतात. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या शोध प्रबंधाच्या आधारे आरबीआय ची स्थापना 1 एप्रिल 1935 साली करण्यात आली. तसेच भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण या त्यांच्या संशोधनकार्याच्या जोरावर देशात वित्त आयोगाची स्थापना झाली. शेतीला शाश्वत पाणी पुरवण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे आणि शेतकरी व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल असे मौलिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले. पीक पद्धती, पाणीपुरवठा, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री आणि शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावे असेही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. कामगारांच्या हितासाठी आरोग्य विमा योजना ,भविष्य निर्वाह निधी कायदा ,कामगार कायदा आणि किमान वेतन कायदा या संदर्भात त्यांनी काम केले . आभार प्रा.भगवान महाले यांनी मांडले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही डी अहिरे ,शैक्षणिक सुपरवायझर प्रा. एस. एम. भोये, कार्यालयीन अधीक्षक श्री. आर. टी. चौधरी ,प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिनिधी – किशोर जाधव सुरगाणाना-नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या