Advertisement

नागपुर - जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील तार कंपनी जवळ बस ची कार ला धडक , महिला जख्मी

नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील तार कंपनी जवळ बस ची कार ला धडक , महिला जख्मी

फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसरातील नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील तार कंपनी जवळ अज्ञात बस चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन कार ला मागुन जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार चे मोठे नुकसान झाले असुन व एक महिला जख्मी झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी महिला सोनाली येनुलकर यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक ३ डिसेंबर ला रोजी दुपारी १:०० वाजता च्या दरम्यान फिर्यादी सौ. सोनाली विलासराव येनुलकर वय ३१ वर्षे रा. तळेगाव काकड धरा , वर्धा हे आपल्या पती नामे विलासराव येनुलकर व मुलगा सोबिन आणि फिर्यादी यांचा पती विलासराव यांचे मित्र नामे राजू किसनराव कूटे त्यांची पत्नी माधूरी व त्यांचा मूलगा व लहान मुलगी असे मिळून सोनाली यांचा कार क्र एम एच ४३ ए डब्लु-१०१५ नी टिमकी नागपूर येथे असलेल्या परमात्मा एक च्या निवास स्थानी दर्शना करीता गेले असता तेथुन दर्शन करून सोनाली व त्यांचे कुटुंब सहकारी परमात्मा एक भवन वर्धमान नगर नागपूर येथून वेळ अंदाजे ५:३० वाजता च्या दरम्यान सोनाली यांचे माहेर खंडाळा डूमरी येथे जाण्याकरीता निघाले असता सायंकाळी ७:०० च्या सुमारास नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा ने जात असतांना तार कंपणी जवळ एका अज्ञात बस च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवुन सोनाली यांचा कार ला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सोनाली यांची कार पलटी झाल्याने कार चे मोठे नुकसान झाले असुन सोनाली ही जख्मी झाली असून सध्या माहूरे हॉस्पीटल कामठी येथे आय सु विभागात उपचार घेत असुन सोनाली यांचा सोबत असलेले कोणत्याही लोकांना कोणत्याही प्रकारची जखम किंवा दुखापत झालेली नसुन त्यांचावर कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे उपचार करण्यात आला असुन कन्हान पोलीसांनी फिर्यादी सोनाली येनुलकर यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात बस चालका विरुद्ध कलम २७९,३३८ भादवी सह क. १८४, १३४ (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या