Advertisement

महात्मा फुलेंचे कार्य उल्लेखनीय- प्रा.जयराम माळी

महात्मा फुलेंचे कार्य उल्लेखनीय- प्रा.जयराम माळी

सुरगाणा :महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे महात्मा फुले यांची पुण्यतिथी दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी साजरी करण्यात आली .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्ही.डी. अहिरे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. इतिहास विभागातील प्रा. जयराम माळी यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की ,महात्मा फुले यांचे कार्य हे अतुलनीय आहे .

ज्या काळात सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळत नव्हते अशा काळात मुलींच्या शिक्षणाचा विचार करणे ही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रांतिकारी घटना होती आणि हे कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशिवाय अशक्य होते. शेतकरी व कामगार अशा सर्वच घटकांचा विचार करून त्यावर कृतिशील कार्य करणारे महात्मा फुले हे भारतातील अग्रणी समाज सुधारक होते .महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. शेतकऱ्यांचे आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. शेतकऱ्यांवर कशा पद्धतीने अन्याय होतो याचे वास्तव मांडणारे ते पहिले समाजसुधारक होते. शेतकऱ्यांची परिस्थिती आजही तशीच आहे. त्यात सुधारणा झालेली नाही. प्रा. एस .आर .पावडे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार बी.एच. टोपले यांनी मांडले यावेळी शैक्षणिक सुपरवायझर प्रा. एस. एम. भोये, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिनिधी – किशोर जाधव (सुरगाणा/नाशिक)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या