Advertisement

कन्हान-पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर पाचव्या दिवशी प्रहार जनशक्ती संघटने द्वारे साखळी उपोषण केले

कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर पाचव्या दिवशी प्रहार जनशक्ती संघटने द्वारे साखळी उपोषण केलेकाॅंग्रेस

कमेटी नागपुर जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र मुळक यांनी दिली भेट

१०० पेक्षा जास्त लोकांनी साखळी उपोषणाला भेट देऊन केले समर्थन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लीवर लीमिटेड ची संपूर्ण 18.78 एकड़ जागा ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आल्याने शहराच्या सर्वांगीण विकास कार्य आणि मुलभुत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटने च्या वतीने गुरुवार दिनांक २२ डिसेंबर पासुन कन्हान – पिपरी नगर परिषद कार्यालय समोर साख़ळी उपोषण सुरू आहे . या उपोषणाला राजकीय , सामाजिक संघटने च्या क्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे .

सोमवार (दि.२६) डिसेंबर ला पाचव्या दिवशी प्रहार जनशक्ती संघटने चे जिल्हाध्यक्ष मा.रमेश कारेमोरे , कन्हान – पिपरी नगर परिषद नगरसेवक विनय यादव , सौ.राजेश्वरी पिल्ले , सुनीता कारेमोरे , प्रवीण शेंडे यांच्या द्वारे उपोषण करण्यात आले

या साखळी उपोषणा च्या पाचव्या दिवशी काॅंग्रेस कमेटी नागपुर जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र मुळक यांनी उपोषण स्थळी भेट देऊन समर्थन दिले आणि विविध पक्षाचा संघटने च्या १०० पेक्षा जास्त लोकांनी उपोषण स्थळाला भेट देऊन समर्थन दिले आहे .

आज २७ डिसेंबर ला भाजपा कन्हान शहर महिला आघाड़ी द्वारे साखळी उपोषण करण्यात येणार आहे .

या प्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे वरिष्ठ नेता किशोर बेलसरे , राजकुमार वजेकर , राजेश राऊत , महेंद्र चौहान , लीलाधर बर्वे , रिंकेश चवरे , शैलेश शेळके , विनोद किरपान , मयुर माटे , प्रदीप गायकवाड , अभिजीत चांदुरकर , विजय पारधी , शैलेश पाठक , चिराल वैध , फिरोज शेख , प्रशांत पाटील , हर्ष पाटील , ऋषभ बावनकर , अर्जुन पात्रे , मयुर बोबडे , निलेश गाढवे , मोहन वक्कलकर , सुरेश कळंबे , देवा तेलोते , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या