Advertisement

सर्वधर्म समभाव संघटन द्वारे संविधान दिवस थाटात साजरा

सर्वधर्म समभाव संघटन द्वारे संविधान दिवस थाटात साजरा

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – सर्वधर्म समभाव संघटन द्वारे गांधी चौक येथे संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कन्हान – पिपरी नगरपरिषद उपाध्यक्ष मा.योगेंद्र रंगारी यांच्या हस्ते व रोहित बर्वे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी नप उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांनी संविधान दिवस वर उपस्थितांना मार्गदर्शन केले . त्यानंतर संविधाना च्या प्रस्तावने चे सामुहिक वाचन करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी चंदन मेश्राम , आकिब सिद्धिकी , अजय कापसीकर , दिलीप मसार , अविनाश हातागडे , अक्षय फुले , चंदु हातागडे , उपासराव खोब्रागडे , रवींद्र दमाहे , मिरा मेश्राम , सह आदि नागरिक उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या