Advertisement

कन्हान ला रक्तदान शिविर कार्यक्रमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दिली श्रद्धांजली

कन्हान ला रक्तदान शिविर कार्यक्रमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दिली श्रद्धांजली

हमारी दुनिया समाजसेवा संघटन द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान तारसा रोड गहुहिवरा चौक येथे हमारी दुनिया समाजसेवा संघटन कन्हान द्वारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिवस निमित्य रक्तदान शिविर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित ज्ञानेश्वर नारद दारोडे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन रक्तदान शिविर कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी निखिल रामटेके , अखिलेश मेश्राम , यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . रक्तदान शिविरात नाशिकराव तिरपुडे ब्लड सेंटर च्या सहकार्याने एकुण
२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले असुन कार्यक्रमात उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजली अर्पित करुन महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला .

या प्रसंगी शरद डोणेकर , सुत्तम मस्के , नेवालालजी पात्रे सह आदि मान्यवर उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ज्ञानेशवर दारोडे , सौरभ यादव , अखिलेश मेश्राम , कामरान भाई , केतन भिवगडे , उमेश भोयर , राहुल बावने , विक्रम खडसे
निखिल रामटेक , स्टीफन फ्रांसिस , राहुल मनघटे , सह आदि ने सहकार्य केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या