सुरगाणा महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली
सुरगाणा:- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी सुरगाणा गावात रॅली काढण्यात आली. सदर रॅलीद्वारे एड्स विषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी हा उद्देश होता .सदर रॅली ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.जी. दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. एस. आर. पावडे, प्रा. के. के. भोये ,प्रा. भगवान महाले तसेच ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर राकेश पाटील यांनी सदर रॅलीसाठी विशेष परिश्रम घेतले. सदर रॅली प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. अहिरे ,शैक्षणिक सुपरवायझर प्रा. एस .एम. भोये, , कार्यालयीन अधीक्षक श्री. आर. टी. चौधरी ,महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या