Advertisement

कन्हान परिसरात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ३९८ वी जयंती थाटात साजरी

कन्हान परिसरात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ३९८ वी जयंती थाटात साजरी

विविध ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान परिसरात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती विविध कार्यक्रमासह थाटात साजरी करण्यात आली.

कांद्री वार्ड क्र.२ येथील हनुमान मंदिर परिसर

कांद्री वार्ड क्र.२ येथील हनुमान मंदिर जवळ श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९८ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित कांद्री ग्राम पंचायत माजी सदस्य शिवाजी चकोले यांचे हस्ते श्री संत संताजी

 

जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी वामन देशमुख, शाहिर विक्रम वांढरे सह मान्यवरांनी श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले .

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करित जयंती थाटात साजरी करण्यात आली .

या प्रसंगी अतुल हजारे, प्रविण आकरे, रोहित च

 

कोले, धनराज ढोबळे, श्याम मस्के, मनोज भोले, प्रशांत देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण हिंगे, हिरामन मदनकर, रामा हिवरकर, वासुदेव आकरे सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

श्री संत संताजी सत्कार समिती कन्हान-कांद्री

 

श्री संत संताजी सत्कार समिती कन्हान-कांद्री द्वारे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९८ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन संताजी सभागृह कांद्री-कन्हान येथील श्री संत संताजी मंदिरात करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित माजी राज्यमंत्री मा. राजेंद्र मुळक यांच्या हस्ते श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी संताजी सत्कार समिती कन्हान-कांद्री संस्थेचे अध्यक्ष शरद डोणेकर, उपसभापती करूणा ताई भोवते, कांद्री ग्राम पंचायत माजी सरपंच बलवंत पडोळे सह आदि मान्यवरांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करित जयंती थाटात साजरी करण्यात आली .

याप्रसंगी कांद्री ग्रा. पं. माजी उपसरपंच श्यामकुमार बर्वे, श्रीसंत संता जी सत्कार समिती संस्थेचे सचिव अशोक हिंगणकर, वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, धनराज कारेमोरे , दयाराम भोयर, राहुल टेकाम, गणेश सरोदे, बैशाखु जनबंधु, देवचंद कुंभलकर, मधुकर कामडे, प्रकाश चाफले, फजित बावणे सह समाज बांधव, नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

टेकाडी येथे संताजी जगनाडे महाराज जयंती थाटात साजरी

शहरातील टेकाडी गावात श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहा ने थाटात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित प्रहार जनशक्ती संघटना चे जिल्हाध्यक्ष मा. रमेश कारेमोरे यांच्या हस्ते श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रहार जनशक्ती संघटनाचे जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे, माजी पंचायत समिती सदस्य श्री. पंढरीजी बाळबुधे, माजी उपसरपंच चंद्रमणी भेलावे, माजी सदस्य विनोद ईनवाते सह मान्यवरांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व नागरिकांनी श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या