Advertisement

कन्हान - पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर चौथ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष च्या पदाधिकार्यांनी केले साखळी उपोषण

कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर चौथ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष च्या पदाधिकार्यांनी केले साखळी उपोषण

१०० पेक्षा जास्त लोकांनी साखळी उपोषणाला दिली भेट

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान :- कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लीवर लीमिटेड ची संपूर्ण 18.78 एकड़ जागा ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आल्याने शहराच्या सर्वांगीण विकास कार्य आणि मुलभुत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटने च्या वतीने गुरुवार दिनांक २२ डिसेंबर पासुन कन्हान – पिपरी नगर परिषद कार्यालय समोर साख़ळी उपोषण सुरू आहे .

रविवार (दि.२५) डिसेंबर ला चौथ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख मा.प्रेम रोडेकर , पारशिवनी तालुका प्रमुख मा.महेंद्र भुरे , उप शहर प्रमुख पुरुषोत्तम येलेकर , जिल्हा परिषद सर्कल प्रमुख राहुल सोनबरसे , शहर प्रमुख प्रभाकर बावने यांच्या द्वारे उपोषण करण्यात आले .

या साखळी उपोषणा च्या चौथ्या दिवशी विविध पक्षाचा संघटने च्या १०० पेक्षा जास्त लोकांनी उपोषण स्थळाला भेट देऊन समर्थन दिले आहे .

आज २६ डिसेंबर ला प्रहार संघटन द्वारे जिल्हाध्यक्ष मा.रमेश कारेमोरे , नगरसेवक विनय यादव यांचा द्वारे साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन करणार आहेत .

या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगरसेविका मौनिका पौणिकर , माजी नप उपाध्यक्ष व नगरसेवक डायनल शेंडे , युवा सेना रामटेक विधानसभा सरचिटणीस लोकेश बावनकर , महेंद्र चौहान , उमेश पौनिकर , रिंकेश चवरे , शैलेश शेळके ,अनिलजी जाधव , प्रदीप बावने , अद्रीराम कनोजिया, लिलाधर बर्वे , देवा तेलोते , विनोद किरपान , मयूर माटे , महेश धोगड़े , सुरेश कळंबे , राजेंद्र शेंदरे , ऋषभ बावनकर , मनोज हुड , राजन मनगटे , नितेश बुराडे , चिराल वैद्य , प्रदीप गायकवाड , सूरज उके , कामेश्वर शर्मा , मनोहर तीवाडे , समीर मेश्राम , रविंद्र ठाकरे , संजय चहांदे , योगराज अवसरें , हीरालाल गुप्ता, पंकज जुगेल , गणेश मस्के , मनीष भिवगड़े , नरेंद्र शिंदे , विक्की जीभकाटे , सुनील पिल्ले , रंगराव ठाकरे , जीवन ठवकर , रत्नदीप बागड़े , राधेश्याम भलावी , प्रशांत पाटील विलास खोब्रागडे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या