Advertisement

परिसरातील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंध्यावर अंकुश लावण्याची मागणी

परिसरातील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंध्यावर अंकुश लावण्याची मागणी

सात दिवसाचा आत कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करु – अतुल हजारे

भाजपा पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षक मार्फत पोलीस अधिकक्षकांना निवेदन

कन्हान – कन्हान शहरात व ग्रामीण भागात दिवसेन दिवस गुन्हेगारी आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बिनधास्त पणे सुरु असुन शांती सुव्यवस्थे वर प्रश्न निर्माण झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका च्या पदाधिकार्यांनी सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले यांची भेट घेऊन चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन परिसरातील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंध्यावर अंकुश लावण्याची मागणी केली आहे .

कन्हान ,कांद्री , टेकाडी (को. ख) परिसरात मागील दोन महिन्या पासून गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे आणि त्याचा प्रशासना द्वारे कुठल्याही प्रकारचा दबाब तंत्र नसुन कारवाई होत नसल्याने सामान्य नागरिकांना व व्यावसायिकांना गावगुंडांच्या त्रासाने भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन जीवन जगणे कठीण झालो आहेत . या बाबत विविध संघटने द्वारे वारंवार तक्रार करून आणि निवेदन देऊन ही गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगार पोलीस प्रशासनच्या हाती तुरी देऊन कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा हे गावगुंड करत असुन त्यात अल्पवयीन गुन्हेगार दिवस रात्र दारू-गांज्याचा नशा करून , सामान्य नागरिकांना चाकुचा धाक दाखवणे , व्यावसायिकांकडून अवैध वसुली करणे , जीवे मारण्याच्या धमक्या देणे , चाकू कट्टे असे घातक शस्त्र घेऊन परिसरात शांती सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे .

या गावगुंडांकडून गेल्या काही दिवसा पासुन कोणते कोणते बेकायदेशीर गुन्हे घडवून आणल्यावर हि यांना पोलीस प्रशासनाचा कुठलाही धाक राहिला नसुन दिवसेंदिवस गावगुंडांची हिम्मत वाढलेली आहे . त्यामुळे आतापर्यंतच्या पहिल्या घटनांच्या तपासातील गावगुंडांचा शोध घेऊन तात्काळ त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करावी . मागील काळात या गावगुंडांवर वचक ठेवणे , रात्रीच्या पोलीस ग्रस्ती वाढविणे असे लिखित निवेदने दिल्या वर ही पोलीस प्रशासना त्यावर कुठल्याही प्रकारची अंबलबजावणी केली नसुन या गावगुंडांच्या रोजच्या हरकती वाढल्याने  नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका पदाधिकार्यांनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांचा नेतृत्वात कन्हान सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले यांची भेट घेऊन चर्चा करुन तसेच  पोलीस अधिकक्षक विशाल आनंद यांचा नावाचे निवेदन देऊन परिसरातील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंध्यावर सात दिवसाचा आत अंकुश लावण्याची मागणी केली आहे . अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .

या प्रसंगी भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , रिंकेश चवरे , अविनाश कांबळे , मोती हारोडे , कामेश्वर शर्मा , सौरभ पोटभरे , लोकेश आंबाळकर , प्रतिक्षा चवरे , मिना कळंबे , सचिन वासनिक , लीलाधर बर्वे , शैलेश शैळके , मयुर माटे , ऋषभ बावनकर , रवि महाकाळकर , अमोल साकोरे , मनोज लगे ,बंटी यादव , शुभम यादव प्रवीण सिंग ,  चिंतामण सार्वे , चंद्रशेखर चिकटे ,  सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या