हे सरकार , शासन , प्रशासन शेतकऱ्यांचे जीव गेल्यावर कारवाई करणार का
आंदोलन दरम्यान एका महिलेला लकवा मारला तर दुसरी महिला चकर येऊन पडल्याने तिचा हात तुटला
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – महामिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लि. (गुप्ता़) कोल वॉशरी च्या प्रदुषणाने त्रस्त वराड़ा , वाघोली , एसंबा घाटरोहणा व गोंडेगावच्या शेतकऱ्याचे आंदोलन दडपण्यास व चोरीने कोळसा ट्रक काढण्यास शेतकऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी मध्यरात्री पकडुन कन्हान पोलीस स्टेशन ला नेऊन नविन नगरपरिषदेत कोबुन ठेवल्याने पोलीस प्रशासना विरुद्ध संतापलेल्या सरपंचा विद्याताई चिखले सह परिसरातील सरपंच , ग्रा प सदस्य , राजकीय मंडळी व शेतकऱ्यांनी दिवसभर कन्हान पोलीस स्टेशन ला घेराव आंदोलन करून एक तर शेतकऱ्यांवर किंवा कंपनी वर गुन्हा दाखल करून कोल वासरी दुसरी कडे जंगलात स्थानतरित करा किंवा कंपनी बंद करण्याची मागणी केल्याने १७ तासा नंतर कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे हयानी ६८ ची कार्यवाई करून सायंकाळी आंदोलनकारी शेतकऱ्यांना वराडा गावात नेऊन सोडले.
या आंदोलनात सहभागी गोंडेगाव येथील जनाबाई नारायण लांडगे हिला सोमवार (दि.२६) डिसेंबर ला लकवा (पँरिलेसस) मारल्याने त्यांंचा उपचार सुरू आहे . आज गुरूवार (दि.२९) डिसेंबर २०२२ ला कोल वॉसरी सामोर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना आंदोलनकारी रेखाबाई घनश्या मजी वाढई वय ५४ वर्ष राह वराडा हया सायंकाळी ५ वाजता बाथरूम ला जातांना चकर येऊन खाली पडल्याने त्यांचा हात तुटल्याने त्यांना ही शेतकऱ्यांनी कामठी येथील खाजगी रूग्णालयात उपचारा करिता दाखल करण्यात आले आहे .
पारशिवनी तालुक्यातील गोंडेगाव कोळसा खुली खदान लगत वराडा व मौजा एसंबा येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळा द्वारे महामिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लि. कोल वाशरी चा प्लांट मार्च २०२१ ला सुरू करण्यात आली. या कोल वॉशरी मध्ये गोंडेगाव कोळसा खुली खदान व इतर खदान येथुन येणाऱ्या कोळस्याला वॉश करण्यात येत असल्याने उडणाऱ्या कोळसा धुळीमुळे वायु आणि जल प्रदुषणाने वराडा, वाघोली, एंसबा, घाटरोहणा व गोंडेगाव येथील ६०० एकरावर शेती पिक प्रदुषित होऊन नुकसान होत आहे.
कोळसा धुर मिश्रीत पाण्यामुळे जमिनीचे पाणी ही प्रदुषित झाले आहे. धुळकणामुळे गावकऱ्यांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी कोळसा धुळीचे प्रदुषण बंद करण्यास वारंवार शासन , प्रशासन व संबधित अधिकाऱ्यांना तक्रार देऊन आंदोलन केले. सावनेर चे आमदार मा सुनिल केदार हयानी विधान कोल वॉसरी मुळे परिसरातील ६०० चे वर शेतपिक व ग्रामस्थ कोळसा धुळीने त्रस्त असल्याने ही कोल वॉसरी दुसरी कडे जंगलात स्थानं तरित करावी किंवा कोल वॉसरी बंद करून शेतकऱ्यांना या कोळसा धुळी च्या प्रदुषणा पासुन मुक्त करित न्याय देण्याची मागणी केली. तरी सुध्दा या विषयी कोळसा धुळीचे प्रदुषण करणाऱ्या कोल वॉसरी चालक , मालका वर कुठलिही कारवाई करण्यात येत नसल्याने तसेच कोल वॉसरी जोमाने सुरू असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवुन हे सरकार, शासन , प्रशासन शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर न्याय देणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे.


0 टिप्पण्या