कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर तिसऱ्या दिवशी युवा क्रांती संघटन च्या पदाधिकार्यांनी केले साखळी उपोषण
गोंडवाना संघर्ष समिति ने साखळी उपोषण चे केले समर्थन
योगेश वाडीभस्मे , ज्ञानेश्वर दारोडे यांच्या सह ११५ पेक्षा जास्त लोकांनी साखळी उपोषणाला दिली भेट
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लीवर लीमिटेड ची संपूर्ण 18.78 एकड़ जागा ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आल्याने शहराच्या सर्वांगीण विकास कार्य आणि मुलभुत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटने च्या वतीने गुरुवार दिनांक २२ डिसेंबर पासुन रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात कन्हान – पिपरी नगर परिषद कार्यालय समोर साख़ळी उपोषण सुरू आहे .
शनिवार (दि.२४) डिसेंबर ला तिसऱ्या दिवशी युवा क्रांती संघटन, कन्हान चे अध्यक्ष अभिजीत चांदुरकर , सदस्य ज्ञानेश्वर दारोडे , निलेश गाढवे , धर्मेंद्र गनवीर , केतन भिवगड़े यांच्या द्वारे उपोषण करण्यात आले .
या साखळी उपोषणा च्या तिसऱ्या दिवशी दणका युवा संघटन चे संस्थापक अध्यक्ष मा.योगेश , हमारी दुनिया संघटन चे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारोडे यांनी भेट देऊन जाहिर समर्थन केले आणि गोंडवाना संघर्ष समिती कन्हान शहर अध्यक्ष मा.अनिल भाऊ पंधराम , शंकर इनवाते , संदीप परते , प्रकाश मड़ावी , अंनतराम टेकाम , राजवीर मड़ावी , शिवा भाऊ कुर्वे , राहुल टेकाम यांचा सह विविध पक्षाचा संघटने च्या ११५ पेक्षा जास्त लोकांनी उपोषण स्थळाला भेट देऊन समर्थन दिले आहे .
आज २५ डिसेंबर ला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना च्या वतीने मा.महेन्द्र भूरे यांचा नेतृत्वात साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन करणार आहेत .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद गटनेता राजेंन्द्र शेंदरे , रिंकेश चवरे , शैलेश शेळके , पत्रकार अनिल जाधव , प्रदीप बावने , अद्रीराम कनोजिया , लिलाधर बर्वे , देवा तेलोते , विनोद किरपान , मयूर माटे , हिरालाल गुप्ता महेश धोगड़े , सुरेश कळंबे , शैलेश कड़बे , प्रशील सुखदेवे , नितेश बुराडे , चिराल वैद्य , फिरोज शेख , प्रशांत पाटील , शैलेश दिवे , प्रदीप गायकवाड , सूरज उके , रुषभ बावनकर , कामेश्वर शर्मा , मनोहर तिवाडे यांचा सह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला .


0 टिप्पण्या