छत्तीसगड च्या कुम्हाली संघ स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता
वेकोली गोंडेगाव खदान मैदानावर क्रिकेट स्पर्धेत २० राज्यातील संघ सहभागी
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – वेकोली गोंडेगाव खुली खदान मैदानावर सनसुई क्रिकेट क्लब गोंडेगाव यांच्या वतीने तीन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगड च्या कुम्हाली संघाने अंतिम सामना जिंकत स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता ठरला .
स्व.संजय नायडु यांच्या स्मरणार्थ आयोजित स्पर्धेत विविध राज्यातील वीस संघांनी सहभाग घेतला होता . स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरी सामना डीएनए कामठी विरूध्द अजनी इलेव्हन नागपुर चा झाला . ज्या मध्ये डीएनए कामठी च्या संघाने बाजी मारली . दुसरा उपांत्य फेरी सामना प्रतीक इलेव्हन विरूध्द छत्तीसगढ़ च्या कुम्हाली इलेव्हन मध्ये झाला . यात कुम्हाली इलेव्हन ने बाजी मारली . स्पर्धेचा अंतिम सामना डीएनए कामठी विरूध्द कुम्हाळी संघा मध्ये झाला . यात प्रथम फलंदाजी करताना कुम्हाळी संघाने ८ षटकात ९ गडी गमावित १०४ धावा केल्या. अमित यादव च्या १३ चेंडुत ३२ धावा आणि राजेश कुमार च्या ११ चेंडुत २८ धावांचा समावेश होता . १०५ धावांचा पाठलाग करतांना डीएनए संघ ८ षटकांत ४ गडी गमावुन केवळ ८७ धावाच करू शकला. अशा प्रकारे हा अंतिम सामना छत्तीसगढ़ च्या कुम्हाळी संघा ने जिंकत स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता ठरला .
पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष स्थानी वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्रीय व्यवस्थापक राजेंद्र ठाकरे होते. या प्रसंगी रुद्र ट्रान्सपोर्टचे संचालक बंटी आकरे , टिपु सिंग , वरिष्ठ पत्रकार अजय त्रिवेदी , अनिल सिंग आदीं प्रामुख्याने उपस्थिती होते. यावेळी विजेत्या छत्तीसगड च्या कुम्हाली संघाला शिल्ड , विजेता चषक आणि रुद्र ट्रान्सपोर्टचे रोख ७१ हजार रूपये, तर उप विजेत्या डीएनए संघाला ५१,००१ रुपयांचे बक्षीस देण्यात आले . मॅन ऑफ द मॅच अमित यादव , बेस्ट मॅन नंदु बोरकर , बेस्ट बॉलर राकेश यादव , बेस्ट फिल्डर घनश्याम आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार छत्तीसगड च्या शोबीला मॅच मध्ये उत्कृष्ट कामगिरी साठी देण्यात आला .
स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता समिती सदस्य उमेश पाल, प्रीतम सिंग, रोहित डोंगरे, सतीश गुप्ता, अनुज कांबळे, गौरव भोयर, वैभव भोयर, जसवंत, अरविंद यादव आदी ने सहकार्य केले.


0 टिप्पण्या