कांद्री ला श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३२३ वी पुण्यतिथि साजरी
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कांद्री येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३२३ वी पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नवनियुक्त तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष मा.योगेश वाडीभस्मे यांच्या हस्ते श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी कांद्री ग्रामपंचायत माजी सरपंच बलवंत पडोळे , माजी सदस्य शिवाजी चकोले , जेष्ठ नागरिक कवडुजी आकरे , हेमराजजी आंबाळकर आदि ने संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी श्यामराव चकोले , वासुदेव आकरे , जिभल सरोदे , वामन देशमुख , चंद्रशेखर बावनकुळे , रोहित चकोले , कवडुजी बारई , शंकर सरोदे , सुनीता हिवरकर , उषा वंजारी , पारस देशमुख , श्याम मस्के , मनोज भोले , लोकेश वैद्य , सह आदि नागरिक उपस्थित होते .
0 टिप्पण्या