कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर सहाव्या दिवशी भाजपा महिला पदाधिकार्यांनी केले साखळी उपोषण
भाजपा कन्हान शहर , अनुसुचित जाती मोर्चा , युवा मोर्चा आणि युवक काॅंग्रेस कमेटी पदाधिकार्यांचे उपोषणा ला समर्थन
११० पेक्षा जास्त लोकांनी साखळी उपोषणाला भेट देऊन केले समर्थन
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लीवर लीमिटेड ची संपूर्ण 18.78 एकड़ जागा ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आल्याने शहराच्या सर्वांगीण विकास कार्य आणि मुलभुत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटने च्या वतीने गुरुवार दिनांक २२ डिसेंबर पासुन कन्हान – पिपरी नगर परिषद कार्यालय समोर साख़ळी उपोषण सुरू आहे . या उपोषणाला राजकीय , सामाजिक संघटने च्या क्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे .
सोमवार (दि.२६) डिसेंबर ला सहाव्या दिवशी भाजपा महिला आघाड़ी कन्हान शहर उपाध्यक्ष मीना कळंबे , भाजपा पारशिवनी तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा , नारायण गजभिए , महेंद्र चव्हान , सुरेश कळंबे , यांच्या द्वारे उपोषण करण्यात आले .
या साखळी उपोषणा च्या सहाव्या दिवशी भाजपा कन्हान शहर , अनुसुचित जाती मोर्चा , युवा मोर्चा आणि भारतीय युवक काॅंग्रेस रामटेक विधानसभा क्षेत्राचे आकिब सिद्धिकी , अजय कापसीकर यांच्या द्वारे पत्र देऊन साखळी उपोषणाला समर्थन दिले . तसेच विविध पक्षाचा संघटने च्या ११० पेक्षा जास्त लोकांनी उपोषण स्थळाला भेट देऊन समर्थन दिले आहे .
आज बुधवार दिनांक २८ डिसेंबर ला कन्हान – कांद्री दुकानदार महासंघ द्वारे साखळी उपोषण करण्यात येणार आहे .
या प्रसंगी सौ समर्थना देशभरतार, सौ पौर्णिमा दुबे, रामभाऊ दिवटे, शंकर चहांदे, डॉ मनोहर पाठक, लिलाधर बर्वे, रिंकेश चवरे, शैलेश शेळके, विनोद किरपान, मयूर माटे ,अभिजीत चांदुरकर, चिराल वैद्य, फिरोज शेख, प्रशांत पाटील, हर्ष पाटिल, रुषभ बावनकर, नीलेश गाढवे, प्रदीप गायकवाड़, रवी महाकाळकर, स्वपनिल मते, मोतीलाल हारोडे, अनिल जाधव,धर्मेंद्र गनवीर, सरिता लसुंते, प्रभाकर रुंघे, रेखा टोहने, अमोल साकोरे, रोशन फुलझेले, पंकज नांदुरकर, संजय रंगारी, स्वाती पाठक, राजेन्द्र शेंदरे, तुलेशा नानवटकर, लक्ष्मी लाडेकर, आकाश वाढनकर, प्रशांत पाटील, विक्रांत सोलंकी, आकिब सिद्दीकी, अजय कापसीकर, अनीता पाटील, अमोल रामटेके, प्रतीक्षा चवरे, सुनील लाडेकर सह अनेक लोकांनी सहभाग घेतला .


0 टिप्पण्या