सहकार्याने जिल्हा परिषद केंद्र शाळा खेवारे महाज येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प संपन्न
ठाणे-धसई:- धसई (05/12/2022)जिल्हा परिषद केंद्र शाळा खेवारे महाज या शाळेला वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे या मंडळाचे संस्थापक श्री आनंदजी भागवत तसेच श्री.नाईक , नामजोशी , आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी डॉ श्री.विलास मारुती सुरोशे ( आप्पा) त्याच बरोबर रोटरी क्लबचे अधिकारी श्री.आरुणजी सपकाळ , विनोदजी चौधरी ,शुभमजी या सार्व मान्यवर मंडळी यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद केंद्र शाळा खेवारे महाज या शाळेला रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प मंजूर करुन प्रकल्पाचे काम पूर्ण देखिल करण्यात आले या प्रकल्पामुळे जिल्हा परिषद केंद्र शाळा खेवारे महाज या शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. शाळेच्या दोन इमारत आहेत त्या आरशिशी आहेत दोन्ही इमारती वर पत्रा शेड आहेत या दोन्ही इमारतींना पन्हाळी बसविण्यात आले आहेत.
या इमारतीला तिनं फिल्टर लावले आहेत.पाऊसाचे पाणी पन्हाळी द्वारे फिल्टर मध्ये येणार आहे फिल्टर झालेले पाणी चेंबर मध्ये येईल चेंबर पासून पाईप लाईन बोअरवेल पर्यंत नेण्यात आली आहे. बोअरवेल सभोवताली टाकी तयार करून त्या टाकीमध्ये नदीच्या पात्रात असणारे दगड गोटे यांचे थर लावून बोअरवेलच्या केसीग पाईपला जाली लावण्यात आली आहे एका वेळेस ६५०० इतके क्युसेस पाणी बोअरवेल मध्ये जमा होणार आहे परिणामी भुजळ पातली वाढून हे पाणी शाळेतील मुलांना टंचाई काळात वापर करता येईल व या प्रकल्पाचा शाळेला खुप मोठा फायदा होणार आहे.
हा प्रकल्प राबवताना जिल्हा परिषद केंद्र शाळा खेवारे महाज या शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सतोष म्हाडसे, उपाध्यक्ष श्री.विश्वास सुरोशे, शिक्षण तज्ञ श्री.सुरज सुरोशे, सदस्य श्री.दिंगबर सुरोशे,श्री.किशोर घोलप,श्री.प्रकाश भेरे,श्री.रघुनाथ सुरोशे,श्री.संतोष कंटे,सदस्या सौ.तनुजा केदार,सौ.माधुरी सुरोशे,सौ.विमळ भेरे, श्रीमती सुमन कार्ले,खेवारे ग्रामपंचायत उपसरपंच श्री.अंकुश सुरोशे ग्रामस्थ श्री.उत्तम सुरोशे, सोमनाथ सुरोशे,सतिश सुरोशे,श्री.वाळकु सुरोशे,श्री.नाथा गव्हाळे महाज ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री.प्रदिप सुरोशे, जेष्ठ नागरिक श्री.यशवंत पारधी, दोन्ही गावचे सरपंच, पोलिस पाटील, केंद्राचे केंद्र प्रमुख श्री.मधुकर मोहपे , शाळेचे मुख्याध्यापक श्री.अरुण शेलवले सर, वरिष्ठ शिक्षक श्री.रघुनाथ पष्टे सर , सहशिक्षक श्री.सुनिल कथोरे सर,श्री.संजय चव्हाण सर,श्री.सुनिल पाटोळे सर, सहशिक्षिका सौ.अनिता भोंडीवले मॅडम,सौ.अनुप्रिया शिंदे मॅडम, शाळेचे माजी विद्यार्थी कु.भावेश सुरोशे,रोशन सुरोशे, रमेश सुरोशे, उल्हास सुरोशे, सर्व पालक वर्ग, तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी यांचं मोलाचं सहकार्य लाभले शाळेच्या वतीने व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे व महिंद्रा फाईन्सस कंपनी व रोटरी क्लब यांचे आभार मानण्यात आले.
0 टिप्पण्या