Advertisement

मावळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला ६, भाजपा २ तर शिरगाव ग्रामपंचायत बिनविरोध

मावळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला ६, भाजपा २ तर शिरगाव ग्रामपंचायत बिनविरोध

वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील नुकत्याच ९ गावातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या शिरगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर इंदोरी, देवले, निगडे ,सावळा, वरसोली व कुणे नामा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले तर गोडुंब्रे व भोयरे ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले. ग्रामपंचायत निवडणुका शांततापूर्ण वातावरणामध्ये पार पडल्या तर निगडे व भोयरे ग्रामपंचायत निवडणुकीत पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सभेला “कही खुशी कही गम ” असे यश संपादन झाले.

सरपंच पदाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:-

शिरगाव
प्रविण गोपाळे (बिनविरोध)

इंदोरी
शशिकांत शिंदे (विजयी) १७७५ मते
मधुकर ढोरे १४१२ मते
अंकुश ढोरे ११२५ मते

वरसोली
संजय खांडेभराड (विजयी)७०९ मते
बबन खरात ५३९ मते

निगडे
भिकाजी भागवत (विजयी)६५४ मते
संदेश शेलार ६४० मते

देवले
वंदना आंबेकर (विजयी) ५८२ मते
सोनाली गिरी ३६१ मते
माया यादव २६ मते

कुणे नामा
सुरेखा उंबरे (विजयी) ५०६ मते
नलिनी उघडे २८४ मते
रेश्मा जाधव १६९ मते
राणी भोरडे ४१ मते

भोयरे
वर्षा भोईरकर (विजयी) ४८९ मते
सुरेखा भोईरकर ३८१ मते
रोहिणी आडीवळे १८९ मते

सावळा
मंगल ढोंगे (विजयी) ४५४ मते
मनीषा आढारी २८८ मते

गोडुंब्रे
निशा सावंत (विजयी) ३७६ मते
कल्पना सावंत २४९ मते
प्रियांका चोरगे १३३ मते.

प्रतिनिधी: सुखदेव जाधव-मावळ-तालुका-(पुणे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या