सिमेंट चे दोन विद्युत पोल तोडुन २००० मिटर अॅल्युमिनियम तार अज्ञात चोरट्यांने केले लंपास
सिहोरा बौद्ध बिहारा जवळील घटना , कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सिहोरा बौद्ध बिहारा जवळील विद्युत लाईट सिमेंट चे दोन पोल तोडुन २००० मिटर अॅल्युमिनियम तार कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी प्रल्हाद ओमकार यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार (दि.८) डिसेंबर ला सकाळी ८ ते ८:३० वाजता च्या दरम्यान कन्हान महावितरण केंद्रा चे सहायक अभियंता प्रल्हाद बुधदुलाल ओमकार वय ३८ वर्ष रा.हनुमान नगर कन्हान यांना किशोर बेलसरे रा.शिवनगर कन्हान यांंनी फोन करुन सांगितले कि माझ्या डाब्यावरील विद्युत लाईट गेली आहे . अशी माहिती दिल्याने प्रल्हाद ओमकार यांनी लाईन मेन राजेश कनोजिया यांना फोन लावुन सांगितल्याने राजेश यांनी जाऊन चेक केले असता त्यांनी प्रल्हाद ओमकार यांना फोन करुन सांगितले कि सिहोरा बौद्ध बिहारा जवळील विद्युत लाईट चे दोन सिमेंट चे पोल तोडलेले असुन पडले आहे . त्याचे नुकसान २०,००० रु झाले आहे व या दोन सिमेंट विद्युत पोल मधील अॅल्युमिनियम तार ५०० मीटर प्रमाणे एक पोल चार तार नुसार एकुण २००० मीटर तार अज्ञात चोराने चालु लघुदाब वाहनी बंद करुन सिमेंट पोल तोडुन त्यावरील बसवलेली २००० मीटर तार अंदाजे किंमत ५५,००० रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी प्रल्हाद ओमकार यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भांदवि सहकलम १३७ भाविका अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .


0 टिप्पण्या