भाजपा पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दिली श्रद्धांजली
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भाजपा अनुसुचित जाती मोर्चा कन्हान शहर द्वारे आंबेडकर चौक येथे ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी श्रद्धांजलि अर्पित केली .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या वेळी भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , अनुसुचित जाती मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष संजय रंगारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चिरित्र्यावर प्रकाश टाकुन उपस्थितांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजलि अर्पित करुन महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला .
या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे , कामेश्वर शर्मा , महेंद्र चव्हान , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका संगीता खोब्रागडे , अनिता पाटील , स्वाती पाठक , तुलेषा नानवटकर , प्रतीक्षा चवरे , मीना कळंबे , रिंकेश चवरे , शैलेश शैळके , मयुर माटे , विनोद किरपान , लीलाधर बर्वे , सुरेश कळंबे , आकाश वाडणकर , सौरभ पोटभरे , मोती हारोडे मनोज कुरडकर , दिपनकर गजभिये , चंद्रगुप्ता पानतावने सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .


0 टिप्पण्या