पेंच पाटबंधारे चा बोरी (सिंगोरी) गावात कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान
सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व अधिकाऱ्यांन वर कारवाई करा – संजय सत्यकार
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुकातील पेंच पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या टेकाडी उपविभागातील बोरी (सिंगोरी) गाव शेत शिवारातील कालवा फुटल्याने गावातील १६ ते २० शेतकऱ्यांचे उभे असलेले गहु व हरभरा पिके पुर्णपणे पाण्यात बुडाल्याने शेतपिक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाल्याने तात्काळी नुकसान भरपाई ची मागणी संजय सत्यकार आणि शेतकऱ्यांनी केली आहे .
मंगळवार (दि.२७) ला सकाळी शेतकरी शेतात गेले तर त्यांच्य शेतात पाणीच पाणी साचुन शेत पिक पाण्यात बुडाली बघायला मिळाले. त्यांच्या शेतातील गहु, हरभरा पिकांमध्ये पाणी शिरले पाहुन त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली . शेतकऱ्यांनी सकाळी आठ वाजता पाटबंधारे अधिकाऱ्यांना कळवले. त्यांनी थेट शेतकऱ्यांशी उलट बोलणे सुरू केले आणि दुपारी २ वाजता येऊन शेतकऱ्यांना उलट भाषेत बोलने सुरु केले असता शेतकऱ्यांनी घटनेची माहिती संजय सत्यकार यांना दिली असता संजय सत्यकार यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचुन स्थितीचा आढावा घेतला आणि घटनेची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांना दिली व सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच संबधित पाटबंधारे विभागातील अधिकारी व जवाबदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजय सत्यकार व परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थानी केली आहे .


0 टिप्पण्या