Advertisement

टोकावडे परिसरातील खापरी येथे आरोग्य शिबीर संपन्न

टोकावडे परिसरातील खापरी येथे आरोग्य शिबीर संपन्न

मुरबाड: मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरातील खापरी येथे क्रिस्टल केयर हॉस्पिटल आसनगाव व टोकावडे येथील युवा नेतृत्व महेश राजेश भांगे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात मुखत्व रक्तदाब, रक्ततपासणी, ई सी जि, मधुमेह तपासणी, दमा, सांधेदुखी, तसेच इतर अनेक आजारांवर डॉक्टरांनी तपासणी केली व मोफत औषधे उपचार करण्यात आले या शिबिरात खापरी, कामतपाडा, येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला या शिबिराकरिता डॉ, हिमानी भेरे, नामदेव विशे, व सहकारी यांनी आपले योगदान दिले तसेच हे शिबीर आयोजित करण्या मध्ये टोकावडे येथील सामाजिक कार्यकर्ते महेश राजेश भांगे, सुरेश भांगरथ, राजेश राऊत, प्रभाकर सुर्यराव,सचिन राऊत, ऋतिक म्हारसे, आशासेविका राऊत ताई यांनी मोलाचे योगदान दिले गावोगावी आरोग्य शिबिर आयोजन करण्यात येत असल्याने टोकावडे परिसरात युवा नेतृत्वसामाजिक कार्यकर्ते महेश राजेश भांगे यांचे कौतुक करण्यात येत आहे.

राजेश भांगे/मुरबाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या