Advertisement

कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे कँसर शिबीर कार्यक्रम संपन्न

कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे कँसर शिबीर कार्यक्रम संपन्न

धुम्रपान आणि दारू चे सेवन न करण्याचे डाॅक्टरांनी नागरिकांना आवाहन केले

शिबीरात १२४ नागरिकांनी केली तपासणी

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे नेशनल कँसर इंस्टीट्यूट पथक द्वारे कँसंर शिबीराचे आयोजन करण्यात आले या शिबीरात १२४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी धुम्रपान आणि दारू चे सेवन न करण्याचे डाॅक्टरांनी नागरिकांना आवाहन केले .

सर्व प्रथम नेशनल कँसर इंस्टीट्युट पथकाचे डॉ पवन वरखेडे, डॉ सुजाता पाटील, डॉ शुभांगी सोमलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत वाघ यांचे कन्हान केंन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक राठोड आणि त्यांचा संपुर्ण सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवर डॉक्टरांचे स्वागत , सत्कार करून शिबीराची सुरूवात करण्यात आली. या कँसर शिबीरात नेशनल कँसर इंस्टीट्युट पथकाचे डॉ पवन वरखेडे, डॉ सुजाता पाटील, डॉ शुभांगी सोमलकर हयांनी १२४ नागरिकां च्या विविध आरोग्यांची तपासणी करण्यात आली .

यावेळी नेशनल कँसर इंस्टीट्युट पथकाच्या डॉक्टरांनी कँसर होण्यापासुन कसे टाळावे. ह्या बद्दलची माहिती देत जास्त सुर्यप्रकाशाचा संपर्क टाळावे , फायबरयुक्त आहार घ्या. आहारात जास्त चरबीयुक्त पदार्थ खाऊ नये आणि लाल मांस खाऊ नये . बाहेर तयार केलेले किंवा कॅन केलेला अन्न खाऊ नये , किरणोत्सर्गाचा धोका असेल तर पुरेशी सुरक्षा उपकरणे घा . नियमित व्यायाम करा आणि शरीराचे वजन सामान्य ठेवा . बी एमआय (बॉडी मास इंडेक्स) दररोज तपासा , शरीराची नियमित तपासणी करत राहावे , जेणे करून कोणत्या ही प्रकारची समस्या उद्भभवली तर ती लगेच ओळखता येईल . जर त्वचा निळी पडु लागली , जखम बरी होत नसेल किंवा दीर्घकालीन आजार असेल तर त्या बद्दल डॉक्टरांशी संपर्क साधावा . सर्व लसीकरण नियमित पणे करावे . तसेच धुम्रपान , दारू व इतर नशा न करण्याचे नागरिकांना डॉक्टरांनी भावनात्मक कडकडीचे आवाहन केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या