Advertisement

शिक्षक भारतीचा झंझावती शाळा भेटी व दिनदर्शिका वाटप

शिक्षक भारतीचा झंझावती शाळा भेटी व दिनदर्शिका वाटप

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – नागपुर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील शाळाना शिक्षक भारती संघटने च्या पदाधिकाऱ्यांनी कन्हान परिसरात झंझावत दौरा करित शाळेला भेटी देऊन शाळा व शिक्षकांना नविन दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले .

बुधवार (दि.२१) डिसेंबर ला शिक्षक भारती संघटना नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मा.शेषराव रामटेके, पारशिवनी तालुका कार्यवाह मा. जगदिश मोहोड , तालुका अध्यक्ष मा. दुधाराम शंभरकर आदी शिक्षक भारती पदाधिकाऱ्यांनी पारशिवनी तालुका कन्हान परिसरातील विकास प्राथमिक शाळा , बळीराम दखने हायस्कुल कन्हान , आदर्श हायस्कुल कन्हान , भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ट महाविद्यालय व पंडीत जवाहर नेहरू विद्यालय कन्हान , बीकेसीपी स्कुल कन्हान , नारायणा विद्यालय कन्हान , धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान, नुतन सरस्वसती विद्यालय कांद्री , साईबाबा आश्रम शाळा टेकाडी , यशवंत विद्यालय वराडा , साई नाथ विद्यालय बोरडा , अखिलेश हायस्कुल साटक आदी शाळाना भेटी देऊन शाळेला व शिक्षकांना शिक्षक भारती संघटनेचे नविन वर्षाच्या दिनदर्शिके चे वितरण करण्यात आले . सर्व शाळा व शिक्षकांनी उत्तम प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल संघटनेच्या शिक्षक पदाधिकाऱ्यांनी सर्व शाळा व शिक्षकां चे आभार व्यकत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या