Advertisement

कन्हान पांधन रोड येथे आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सेतू कार्यालयाचे उद्घाटन

कन्हान पांधन रोड येथे आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सेतू कार्यालयाचे उद्घाटन

कार्यालय उद्घाटन प्रसंगी विविध शिबिरांचे आयोजन , अनेक नागरिकांनी घेतला शिबीरा चा लाभ

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पांधन रोड येथे समाजसेवक चिंटू वाकुडकर यांचा ( सेतू) जनसंपर्क कार्यालया चे उद्घाटन आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले आणि विविध शिबिर कार्यक्रम संपन्न करण्यात आले .

सोमवार दिनांक १९ डिसेंबर ला समाजसेवक चिंटु वाकुडकर मित्र परिवार यांच्या वतीने पांधन रोड येथे सेतु कार्यालय उद्घाटन व शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सेतु कार्यालया चे उद्घाटन करुन शिबीर कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . या शिबीरा मध्ये आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांचे विशेष अभियान आपले आमदार कार्यालय आपल्या दारी राबवण्यात आले . शिबिरा मध्ये नवीन उपभोगतांचे वोटिंग कार्ड – ७०,आधार कार्ड- १०, राशन कार्ड- ४२, निराधार कार्ड- १८, इ श्रम कार्ड – ३४ करण्यात आले .

मुख्यत्वे ऑटो चालक व आशा सेविका यांचा भारतीय डाक विभागाचा अपघाती १० लाखाचा विमा ६३ लोकांचा काढुन शिबीर कार्यक्रम संपन्न करण्यात आले .

या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर , वर्धराजजी पिल्ले , माजी नगरसेवक अनिल भाऊ ठाकरे , यांची प्रमुख उपस्थिती होती .

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता समशेर पुरवले , आशीष वानखेडे, मिथूल पौनिकर , छोटू राणे , सोनू खान , अजय चव्हाण , प्रदीप गायकवाड , श्रीकृष्ण माकडे आदी नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या