ब्रेकिंग न्यूज
इंदिर काॅलरी मॅनेजर ऑफिस च्या मागे सुरक्षा कर्मचाऱ्यावर गोळीबार , प्रकृती चिंताजनक
पोलीस अधिक्षक सह पोलीस आला अधिकारी घटनास्थळी दाखल
परिसरात भीतीचे वातावरण निर्माण , कन्हान पोलीसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नंबर सहा येथे इंदिर काॅलरी मॅनेजर ऑफिस च्या मागे भर दिवसा वेकोली च्या एका सुरक्षा कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडुन त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार वेकोलि इंदर काॅलरी येथे एम एस एफ चा कर्मचारी मिलिंद समाधान खोब्रागडे वय ५० हा काही दिवसा पुर्वी खदान मध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून नियुक्त झाला होता . रविवार दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते ४:३० वाजता च्या दरम्यान मिलिंद खोब्रागडे हा इंदर काॅलरी च्या चेक पोस्ट वर कर्तव्यावर रजु होता . त्यावेळी आरोपी समिर सिद्धिकी वय २९ रा. अष्टविनायक काॅलरी टेकाडी व आरोपी राहुल जोसेफ जेअब वय २६ रा.कांद्री हे एका दुचाकी वाहना वर एका इसमाचा शोध घेत तेथे आले . मिलिंद खोब्रागडे याने त्यांना हटकले असता त्या दोघांचा मिलिंद सोबत वाद झाला असता रागाच्या भरात आरोपी समीर याने आपल्या जवळील पिस्तोल माउजर सारखी वस्तु काढुन तीन राऊंड फायर केले . या मध्ये मिलींद खोब्रागड़े हा गंभीर रुपाने जख्मी झाला . त्याला उपचारा साठी कामठी च्या खाजगी रुग्णालय येथे भर्ती केले असता तिथे त्याची प्रकृति चिंताजनक सांगितली जात आहे .
या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे
सदर घटनेची माहिती मिळताच नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशाल आनंद , अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले , उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे , यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली .
0 टिप्पण्या