निलज ग्रामपंचायत येथे महाविकास आघाडी चा ऐतिहासिक विजय
जि.प.विरोधी पक्ष नेते व्यंकट कारेमारे यांचा गावात भाजप चा सुपडा साफ
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील निलज ग्रामपंचायत येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकी मध्ये जि.प.विरोधी पक्ष नेते व्यंकट कारेमारे यांचा गावात भाजप चा सुपडा साफ करण्यात शिवसेना ठाकरे गट आणि काॅंग्रेस चा उम्मेदवारांना यश प्राप्त झाल्याने निलज ग्रामपंचायत येथे महाविकास आघाडी ची सत्ता निवडुण आल्याने पदाधिकार्यांनी ढोल ताशाच्या गजरात नाचत गाचत फटाके फोडुन गुलाल उडवुन विजय जल्लोष साजरा केला .
रविवार दिनांक १८ डिसेंबर ला पारशिवनी तालुक्यातील ७७ मतदान केंद्रा वर ७३.८६% टक्के निवडणुक पोलीसांच्या तगडा बंदोबस्तात शांततेत पार पडले होते .
बुधवार दिनांक २० डिसेंबर ला सकाळी १० वाजता पासुन तहसील कार्यालय पारशिवनी येथे मतमोजणीला सुरवात करण्यात आली असुन सायंकाळ पर्यंत निकाल समोर आले .
यात निलज ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये अत्यंत हलाखीचे जीवन जगत असलेल्या सुनिल ईश्वर डोंगरे याना एस सी राखीव जागे करिता सेना काँग्रेस पक्षाने उम्मेद्वारी देत सुनील ईश्वर डोंगरे यांनी भाजपा समर्थित सरीता देवेंद्र गोलचेडवार यांचा ६८१ मतांनी पराभव केला आहे .
निलज गावात एकुण ३ प्रभाग असून त्यात प्रभाग क्र.१ मध्ये धनराज चकोले यांनी मोहन शिंदे मेश्राम यांचा २०४ मतांनी पराभव केला तर नागरिकांचा मागास वर्गीय प्रवर्गातून सिमा सुभाष देशमुख यांनी दर्शना शेषराव चरडे यांचा १८१ मतांनी पराभव केला . रंजना मंगेश शेंदुरकर यांनी वैशाली राकेश भूते यांचा १८१ मतांनी पराभव केला . प्रभाग क्रमांक २ मध्ये राजकन्या श्याम चकोले ह्या विजयी ठरल्या तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये गुंडे राव गणपत भूते १६८ , रामचंद्र कृष्णा चकोले१७२ मते घेऊन विजयी ठरले . शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस चे ७ उम्मेद्वार हे सरपंचा सहित विजयी ठरले तर तीन उमेदवार यांना पराभव चा सामना करावा लागला .


0 टिप्पण्या