खगोलशास्त्र ज्ञान आणि करीअर पुस्तक प्रकाशित श्री.अनिल बाळकृष्ण घोलप यांचें उपक्रम
मुरबाड तालुक्यातील टोकावडे मानिवली येथील शेतकरी कुटुंबातील श्री अनिल बाळकृष्ण घोलप हे आश्रम शाळा खुट्ल येथे शिक्षक म्हणून काम करत आहेत.त्यानी नुकताच एक खगोलशास्त्र ज्ञान आणि करीअर हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
अनिल घोलप हे कायम निसर्ग सौंदर्य पर्यटन आकाश दर्शन असे विविध नवे उपक्रम घेऊन शिक्षण आणि ज्ञान असा दुहेरी हेतू ठेवून विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करतात या पुस्तक प्रकाशनाने विद्यार्थी यांना फायदा होईल.या कार्यक्रमाला शहापुरातील आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोरा प्रकल्प अधिकारी रंजना किल्लेदार मॅडम व शाळेतील मुख्याध्यापक के आर पाटील शिक्षक वर्ग विद्यार्थी चार ते पाच हजार नागरिक उपस्थित होते .
राजेश भांगे मुरबाड
0 टिप्पण्या