Advertisement

एका सरपंच पदासाठी चार उमेदवार , एका उमेदवाराचे नाव यादीतून गहाळ

एका सरपंच पदासाठी चार उमेदवार , एका उमेदवाराचे नाव यादीतून गहाळ ?

दोषीयांवर योग्य कारवाई करण्याची उमेदवारांची आणि नागरिकांची मागणी

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसररातील बोरडा गणेशी येथे सरपंच पदासाठी ४ उमेदवार तर सदस्य पदासाठी सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.

प्रचार प्रसार झाल्यानंतर चार ही उमेदवार रविवारी मतदार केंद्रावर मतदानाचा हक्क बजावत असताना एका सरपंच उमेदवाराचे नाव नसल्याने तो मतदाराच्या हक्क बजावू शकला नाही.

यादी मध्ये नाव नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सदस्य म्हणून दोन सदस्यांचे या यादीमध्ये नाव नसल्याने त्यांना सुद्धा मतदान करता आले नाही. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला.

या प्रकरणाची तक्रार तहसीलदार प्रशांत सांगडे यांचा कडे करण्यात आली. तहसीलदार प्रशांत सांगडे यांचा मार्फत सरपंच पदाचे उमेदवार व सदस्यांनी विधानसभेच्या यादीनुसार आपला अर्ज दाखल केला होता.

केंद्र प्रमुख यांचा कडे नवीन यादीप्रमाणे नाव नसल्याने त्यांना आपला हक्क बजावता आले नाही. त्यामुळे उमेदवार नाराज होऊन चांगलीच फजिती झाली. यात ज्याचा दोष असेल त्याच्या वर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेदवार आणि नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या