Advertisement

पारशिवनी तालुक्यात 21 ग्रामपंचायत निवडणुकी करिता 73.86 % टक्के मतदान

पारशिवनी तालुक्यात 21 ग्रामपंचायत निवडणुकी करिता 73.86 % टक्के मतदान

एकुण 77 मतदान केंद्रा वर नागरिकांनी केले मतदान तहसीलदार प्रशांत सांगडे यांची माहिती

पोलीसांचा तगडा बंदोबस्तात मतदान शांतीपूर्वक संपन्न

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी तालुक्यातील 21 ग्रामपंचायती च्या थेट जनतेतुन सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी तहसीलदार प्रशांत सांगडे यांचा नेतृत्वात रविवार दिनांक 18 डिसेंबर ला सकाळी 7:30 वाजता पासुन ते सायंकाळी 5:30 वाजता पर्यंत एकुण 77 मतदान केंद्रा वर 73.86% टक्के निवडणुक मतदान शांतीपूर्वक पार पडले अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली .

या ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये एकुण 21 सरपंच आणि 431 उमेदवारां चे भाग्य रविवार ला ईवीएम मशीन मध्ये बंद झाले असुन मतमोजणी मंगळवार 20 डिसेंबर ला पारशिवनी तहसील कार्यालय येथे होणार आहे .

या निवडणुक निकालातुन 21 सरपंच आणि 177 सदस्य पदाची निवड होणार आहे .

या निवडणुकी दरम्यान मतदान केंद्रा वर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये म्हणून कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या