Advertisement

पारशिवनी तालुक्यातील 21 पैकी 11 ग्रामपंचायती वर काॅंग्रेस चा विजय

पारशिवनी तालुक्यातील 21 पैकी 11 ग्रामपंचायती वर काॅंग्रेस चा विजय

भाजपा 5 , शिवसेना (शिंदे गुट) 2 , राकांपा 1 अपक्ष 1

माजी मंत्री सुनील केदार आणि राजेंद्र मुळक यांचा कामाला यश

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी तालुक्यातील 21 पैकी 11 ग्रामपंचायती वर काॅंग्रेस ने विजयाचा दावा केला आहे .

रविवार दिनांक 18 डिसेंबर ला पारशिवनी तालुक्यातील 77 मतदान केंद्रा वर 73.86% टक्के निवडणुक पोलीसांच्या तगडा बंदोबस्तात शांततेत पार पडले होते .

बुधवार दिनांक 20 डिसेंबर ला सकाळी 10 वाजता पासुन तहसील कार्यालय पारशिवनी येथे मतमोजणीला सुरवात करण्यात आली असुन सायंकाळ पर्यंत निकाल समोर आले यात 11 ग्रामपंचायती वर काॅंग्रेस ने विजय दावा केला तर 5 मध्ये भाजप , 2 मध्ये शिवसेना (शिंदे गुट) , राकांपा 1 , आणि 1 ग्रामपंचायत मध्ये अपक्ष सरपंच निवडुन आल्याचे सांगण्यात आले आहे .

तसेच कन्हान परिसरातील बोर्डा (गणेशी) येथे सरपंच पदाच्या उमेदवार मनीषा दाथुरे व सदस्य पदाच्या दोन उमेदवारांची नावे मतदान यादीत नसल्याने त्यांना मतदाना पासून वंचित रहावे लागले. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आक्षेपही नोंदवला होता . आवश्यक कारवाईनंतर सरपंच पदाच्या उमेदवार रेखा दाथुरे (राष्ट्रवादी) व एका सदस्याला विजयी घोषित करण्यात आले. अनुपालन. आदिवासी संवर्गाच्या एका जागेची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. या एका पदासाठी फेरनिवडणूक करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या