Advertisement

कन्हान ला चार दिवसीय छठ पुजा महोत्सव मोठ्या उत्साहाने थाटात साजरा

कन्हान ला चार दिवसीय छठ पुजा महोत्सव मोठ्या उत्साहाने थाटात साजरा

नदी काठावर महिलांनी व भाविकांनी केली पुजा अर्चना

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – उत्तर भारतीय नागरिकांचा साजरा केला जाणारा छठ महोत्सव कन्हान येथे नदी काठावर महिलांनी व भाविकांनी सतत चार दिवस विधिवत पुजा अर्चना करून विविध कार्यक्रमाने कन्हान नदी काठावर अर्घ्य उगवत्या सुर्याला जल अर्पण करून छठ महोत्सव उत्साहाने थाटात संपन्न करण्यात आला .

शुक्रवार (दि.२८) ऑक्टोंबर ला पहिल्या दिवशी नाहय खाय होता या दिवशी उपवास करण्यापुर्वी महिलांनी व भाविकांनी एकदाच जेवण करून नदीत स्नान करित छठ पुजा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला . छठच्या दुसऱ्या दिवसी खरना असुन या दिवशी महिलांनी व भाविकांनी सूर्योदयापासुन सूर्यास्तापर्यंत उपवास करून संध्याकाळी , सूर्यास्तानंतर लगेच अन्न तयार करून सूर्याला नैवैद्य अर्पण करून उपवास सोडला. छठ पुजेचा तिसरा दिवशी महिलांनी व भाविकांनी सायंकाळी नदी काठावर सूर्य देवाला बांबुच्या टोपल्यां मध्ये फळे, थेकुआ, तांदळाचे लाडु आदीने अर्घ्य सज वले. त्यानंतर उपवास करून आपल्या कुटुंबासह सूर्य देवाला अर्घ्य देऊन मावळत्या सूर्याची विधिवत पुजा अर्चना केली. छठ च्या शेवटच्या चौथा दिवशी महिलांनी व भाविकांनी उषा अर्घ्य उगवत्या सूर्याला जल अर्पण केले. याला उषा अर्घ्य असे म्हणत असुन हे अर्घ्य ३६ तास उपवास केल्यानंतर देऊन छठ महोत्सवाची सांगता करण्यात आली.

या छठ महोत्सव निमित्य कन्हान-पिपरी नगरपरिषद आणि कांद्री ग्राम पंचायत प्रशासनाने विजेची, वाहतुकीची आणि इतर व्यवस्था करण्यात आली होती . विविध राजकीय संघटने द्वारे विविध खाद्य पदार्थ, फळ, शरबत आदीचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी नदी काठावर कुठलाही अनुचीत घटना घडु नये म्हणुन कन्हान पोलीसांच्या तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

छट पुजेला ढिवर समाज सेवा संघटना कन्हान चे विशेष सहकार्य लाभले.

छट पुजा महापर्व निमित्त कन्हान नदी घाटावर उत्सव साजरा करतांना नदीच्या प्रवाहात अयोग्य दुध येऊ नये म्हणुन ढिवर समाज सेवा संघटना कन्हान चे अध्यक्ष सुतेश मारबते यांच्या नेतृत्वात ‘जीवन रक्षा पथक ’ चे रामचंद्र भोयर, सचिन खंडाते, मोहन वहाळे , विजय गोंडाणे, उमेश मेश्राम आदी कार्यकर्त्यांनी कन्हान नदी घाटाच्या पात्रात पुजे दरम्यान कुठलाही अनुसुचित प्रकार घडु नये म्हणुन ‘जीवन रक्षा पथकांचे सेवकांनी महत्वाचे समाज कार्य करित सहकार्य केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या