शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीला नऊ महिने सश्रम कारावास
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – गावातील पथदिवे लाईट चे काम का नाही केले असे सांगून 12 वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला न्यायधीश डी.बी. कदम यांनी ६ महिने सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे .
मिळालेल्या माहिती नुसार दिनांक २१०४२०१० चे दुपारी १.४५ वा. सदर गुन्हयातील फिर्यादी हा शासकीय कर्मचारी असुन एम. एस. ई. बी. चे इलेक्ट्रीक मिटर लावण्याचे शासकीय काम करीत असता आरोपी प्रविण चंद्रभान सेलारे, वय ३२ वर्ष, रा. पिपरी कन्हान याने म्हटले की, आमचे गावातील स्ट्रीट लाईटचे काम केले नाही. असे बोलून फिर्यादीला हातबुक्क्याने मारपीट करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा फिर्यादीच्या तोंडी रीपोर्ट वरून सदर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर प्रकरणाचे तपास पोलीस हवालदार ब. नं. ७०५ श्री. राजेंद्र खरबड, पोस्टे कन्हान यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले असता मंगळवार दिनाक २२ ११ २०२२ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश डी. बी. कदम यांनी वरील नमुद आरोपीला कलम ३५३ भादंवि मध्ये ०६ महिने सश्रम कारावास आणि ५ हजार रू. दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद तसेच कलम ५०४ भादंवि मध्ये ०३ महिने सश्रम कारावास व ५ हजार रू. दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी श्री गौरकर यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस पोलीस शिपाई ब. नं. १४६८ सैफुल्लाह अहमद पोलीस स्टेशन कन्हान यांनी मदत केली आहे .


0 टिप्पण्या