पिंपळसोंड येथे दीड हजार फूट खोल दरीतील साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन सुरत येथील सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू
पिंपळसोंड पैकी उंबरपाडा तातापाणी ( गरम पाण्याचे झरे) येथील साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन पंधरा फूटा वरुन खडकावर आपटल्याने विद्यार्थी पर्यटकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पिंपळसोंड येथील पोलिस पाटील रतन खोटरे यांच्याकडून समजले की, सुरत येथील सार्वजनिक काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नोलॉजी या महाविद्यालयात दुस-या वर्षात शिकणारा युवक तक्षिल संजाभाई प्रजापती वय १८ हा त्याच्या दहा ते बारा मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे सहलीसाठी आला होता. दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास हे सर्वजण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील वाहूटचोंड शाॅवर पाॅंईट
धबधब्यावर अंघोळ करीत असतांना खडकावर
शेवाळ असल्याने त्याचा पाय घसरुन पंधरा फूट खाली खडकावर आपटल्याने डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.याबाबत आदिवासी बचाव अभियानाचे कार्यकर्ते रतन चौधरी यांना कळविले असता त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीस निरीक्षक संदीप कोळी, नितीन ढेपले,
सह वनविभागाचे वनरक्षक कर्मचारी अविनाश छगने, वामन पवार
यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी करून सुमारे दीड हजार फूट खोल दरीतून मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने तिवशाची माळी येथे रस्त्यावर काढण्यात आला.पाच वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.खोद दरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी नारायण गावित, माजी सैनिक शिवराम चौधरी,साधु गावित, अनिल बागुल, रामदास गावित, जसे तुंबडा,सुरेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
फोटो-
* पिंपळसोंड तातापाणी साखळचोंड धबधबा येथील दीड हजार फूट खोल दरीतून झोळीतून मृतदेह बाहेर काढतांना पिंपळसोंड येथील ग्रामस्थ.
* मयत- तक्षिल प्रजापती.
प्रतिक्रिया-” निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने केलेली उधळण म्हणजे पिंपळसोंड तातापाणी उंबरपाडा येथे अंबिकेची उपनदी भुतकुड्याच्या ओहोळावर चिंचचोंड,गायचोंड, शेळूणे, साखळचोंड, शाॅवरपाॅंईट,
वाहूटचोंड असे एकाखाली एक असे पाच ते सहा साखळी धबधब्यांची मालिका आहे.हा भाग गुजरात सीमेलगतचा घनदाट जंगल व्याप्त असल्याने गर्द झाडी,लता वेली, महाकाय वृक्ष, दुर्मिळ औषधी वनस्पतींनी बहरलेला अतिदुर्गम डांग भाग आहे. पिंपळसोंड येथे कुंडा रिसोर्ट पर्यटकांना भुरळ घालणारे , आकर्षित करणारे असे असल्याने आठवड्याच्या वीकेंडला खूप गर्दी असते. हा भाग वनविभागाच्या हद्दीत येत आहे. पर्यटकांची खुप गर्दी असते. मात्र वनविभागाने कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत.यापुर्वीचे तत्कालीन उंबरठाण येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांनी दोन वेळा स्वत: धबधब्याची पाहणी केली होती.आराखडा तयार करून सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र परजिल्ह्यात बदलून गेले तरी काहीही केले नाही. केवळ पोकळ आश्वासने देत बेरोजगार युवकांच्या तोंडाला पाने पुसत बदली करून घेत काढता पाय घेतला.आता तरी वनविभागाने सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.”
स्थानिक प्रतिनिधी:- गणेश गाडेकर-सुरगाणा
0 टिप्पण्या