महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज.शास्त्रज्ञ मा.नागदेवते
झिलबोडी येथे कृषी शेती दीन संपन्न
ब्रम्हपुरी-ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी येथे कृषी विभागाच्या वतीने शेती दीन आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून सिंदेवाही येथील विज्ञान केंद्र चे शास्त्रज्ञ नागदेव ते सर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यामध्ये महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधण्यासाठी महत्वाची माहिती दिली. झिलबोडी येथील शेतकरी सुखदेव प्रधान सर यांनी मनोगत व्यक्त करताना हेवेदावे बाजूला सारून परस्परांना सहकार्य करून शेती विकासाच्या माध्यमातून गावाचा करण्यासाठी मार्गदर्शन केले. कृषी साहाय्यक झिलबोडी कु. छाया चंहादे यांनी फक्त शेती वर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय करून सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग महाडीबीटी वर इतर काही कृषी विभागाच्या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्या उर्मिला प्रेमलाल धोटे, संरपच शेंडे, प्रगतशील शेतकरी देविदास नाकतोडे, कृषी मित्र विशाल जी धोटे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या