Advertisement

ग्रामपंचायत आमडी-हिवरी मध्ये आमदार आशिष जयस्वाल द्वारे विविध कामाचा आढावा: सौ शुभांगी राजू भोस्कर

ग्रामपंचायत आमडी-हिवरी मध्ये आमदार आशिष जयस्वाल द्वारे विविध कामाचा आढावा: सौ शुभांगी राजू भोस्कर
आमडी-हिवरी (पारशिवनी):- दिनांक 0७/११/२०२२ ला रामटेक विधानसभा आमदार आशिष जयस्वाल यांनी पंचायत समिती सभाग्रह पारशिवनी येथे   पारशिवनी तालुक्यातील सर्व सरपंच व सचीवांना सुचना दिल्या की प्रतेक ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रतेक गावातील भुमीहिन, हात मजुरांची गावतील प्रतेक ग्रामपंचायत मध्ये नोंद करावी. त्यामुळे या भुमिहीन हात मजुरांची नोंदीचा रेकॉड शासनाकळे राहील. अध्यापही खुपश्या भुमिहीन हात मजुरांची नोंदीचा शासनाकळे रोकॉड नाही. त्यामुळे शासन या भुमिहीन नागरीकांना शासनाची कोणतीही योजना विमा योजना व इतर योजनेचा लाभ या हात मजुरांना देता येत नाही. शासन या बाबद लवकरच आदेश संमधीत सर्व अधिकार्यंना पारीत करेल असेही माहिती रामटेक विधानसभा आमदार आशिष जयस्वाल यांनी बोलतांनी उपस्थीत सरपंच, सचीव व अधिकार्यांना यावेळी दिली.

दिनांक ९/११/२०२२ ला आमडी ग्रामपंचायत अंतर्गत आमडी- हिवरी शेत रस्ते वरील  मंजुर तीन  पालकमंत्री पांधान रस्त्यावरील  शेतकर्यांची ग्रामपंचायत कार्यालया मध्ये मिटींग घेऊन.पाधान रस्ता बनवीण्या बाबत चर्चा  करतांना सरपंचा सौ शुभांगी राजु भोस्कर, पारशिवनी पचांयत समिती बाधकाम विभाग अधिकारी मनोहर जाधव. पांधान रस्तेवील शेतकर्यांन सोबत जाऊन या तीन्ही पांधान रस्ते ची पाहणी केली.

लवकरत लवकर मातीकाम पुर्ण करून या पांधान रस्ते वर मुरूम काम सुरू करण्याची रामटेक विधानसभा आमदार आशिष जयस्वाल यांच्या दिशा निर्देश असल्याचे  यावेळी बोलतांन पारशिवनी पचांयत समिती बाधकाम विभाग अधिकारी मनोहर जाधव यांनी शेतकर्यांना सागीतले. तसेच आमडी -हिवरी गावातील मंजुर असलेल्या घरकुल धारकांचा मंजुर घरकुल काम सुरू न केलेल्या घरांची पाहणी करून कामे लवकर करण्याची सुचना सरपंच व पं.स.अधिकारी जाधव यांनी यावेळी घरकुल लाभ धारकांना दिली.

दिनांक १०/११/२०२२ ला गट ग्रामपंचायत आमडी मध्ये सरपंच सौ शुभांगी भोस्कर यांचा अध्यक्षते मध्ये मतदार यादी चे वाचन व १५ वृत्त आयोगाचा आराखडा तयार करणे बाबद विषेश ग्रामसभा घेण्यात आली. तसेच आमडी-हिवरी महिला बचत गटाच्या ग्राम संघाची सभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. या विषेश सभेला उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील, मंडळ अधिकारी, बचत गट अधिकारी, सचीव व आमडी-हिवरी गावातील मान्यवर नागरीक प्रामुख्यानी उपस्थीत होते.

news ब्युरो पारशिवनी-नागपूर

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या