टेकाडी खदान मडीबाबा परिसरात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्य महिलांना सिलाई मशीन वितरित
श्री गणेश महिला ग्रामसंघ द्वारे कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान-टेकाडी खदान अंतर्गत माडी बाबा श्री कृष्ण मंदिर वार्ड क्र.5 कामठी कॉलरी येथे श्री गणेश महिला ग्रामसंघ द्वारे कार्यक्रमाचे आयोजन माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मा राजेंद्र मुळक माजी मंत्री व अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ रश्मी बर्वे यांच्या हस्ते माजी पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली . यावेळी मां.राजेंद्र मुळक यांनी महिला बचत गटांना मिळणाऱ्या विविध योजने बद्दल माहिती देऊन त्याचे संपूर्ण लाभ कश्या प्रकारे महिलांनी घ्यावे या संदर्भात आपले विचार मुक्त पणे व्यक्त करण्यात आले असुन कोरोना काळात कुटुंब प्रमुख्याला गमावणाऱ्या महिलांना मा.राजेंद्र मुळक यांचा सामाजिक उपक्रमातून सिलाई मशिन प्रमिला ताई मेहर , हिराबाई दहेकर , कु. प्रतीक्षा ताई बोराडे , मंगला ताई बागडे व कू. वैष्णवी ताई सातपैसे या लाभार्थ्यांना वाटप करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी रश्मीताई बर्वे ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष , मंगलाताई निंबोणे सभापती पारशिवणी तालुका , करुणाताई भोवते , उपसभापती पारशिवणी तालुका , आशाताई राऊत , दलजित कौर ताई जंबे ,संगीता ताई दीक्षित , माधुरी ताई चौधरी , सोनाली ताई त्रिपाठी , रेखाताई गजभिये , मीनाताई कावडे , अनुश्री ताई इंगळे , शारदाताई भांडे , प्रिती ताई दिक्षित , रजनी सराटकर , विरेंद्र सिंह , पुजाताई उके , पुष्पलेश ताई सु्यवंशी , विमल त्रिपाठी , मनोज लेकुरवाळे , भीमराव उके , राधेश्याम बोराडे , मनोहर बालपांडे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या