कन्हान ला आज पासुन तीन दिवसीय सांस्कृतिक भीम महोत्सव चे आयोजन
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान च्या वतीने तीन दिवसीय सांस्कृतिक भीम महोत्सवाची रंगारंग सुरवात आज पासुन होत आहे .
कन्हान मध्ये आज पासुन सुरु होणाऱ्या भीम महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर ला बुद्ध धर्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरु ससाई यांचा शुभहस्ते होणार असुन आज महाराष्ट्राचे प्रबोधनकार गायक विचारवंत भगवान गावंडे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर ला प्रख्यात गायक कवी लेखक प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाले यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन रविवार दिनांक १३ नोव्हेंबर ला सकाळी १०:०० वाजता सुमधुर संगीतमय आर्केस्ट्रा , सायंकाळी ६:०० वाजता पासुन संदीप पाल यांचा प्रबोधन व भीम गीताचे आयोजन करण्यात आले आहे .
असे तीन दिवसीय सांस्कृतिक भीम महोत्सवात शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहुन भीम महोत्सवाचा आनंद घ्यावा असे कडकडीचे आव्हाहन आयोजक, चंद्रशेखर भिमटे , सहकारी युवा पत्रकार रोहित मानवटकर , आदि ने केले आहे .


0 टिप्पण्या