सुरगाणा परिसरातील श्री स्वामी समर्थ मठात तुळशी विवाह सोहळा संपन्न
सुरगाणा :- श्री स्वामी समर्थ मठ सुरगाणा परिसरात पारंपरिक पद्धतीने तुळशीविवाह सोहळा संपन्न झाला. आकर्षक रोषणाई, आंतरपात, शुभ मंगल सावधान, मंगलाष्टकाचे मंगलमय सूर, श्री स्वामी समर्थ नामाचा अखंड जयघोष. टाळ मृदुंगाची वाजंत्री, लग्न सोहळ्यासाठी उपस्थित गावकरी मंडळी, श्री स्वामी समर्थ मठातील सेवेकरी गावकऱ्यांच्या साक्षीने पारंपारिक पद्धतीने शहरातील आझाद लेन, तेली गल्ली, मेन रोड, श्री स्वामी समर्थ मठापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे तुळशीविवाह ह्या वर्षी देखील साजरा करण्यात आला. त्यामुळे यंदाचे १४ वे वर्ष असून, श्री स्वामी समर्थ मठातील सेवेकरी, गावकऱ्यांन द्वारे विधीवत पूजा करून सोहळा साजरा करण्यात आला. तुळशीविवाह का करण्यात येतो? तसेच ५६ पदार्थांचा भोग का दिला जातो? यावर मठाचे अध्यक्ष माऊली नितीन महाले यांनी प्रवाचनाच्या माध्यमातून गावकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच हिंदू धर्मात कृष्णा आणि तुळशी यांच्या विवाहाचे विशेष महत्त्व आहे. कारण तुलशीविवाह केल्याने कन्यादानाचा फळ मिळते, तसेच जो तुळशीविवाहाचा सोहळा विधिवत करतो, त्याला मोक्षप्राप्ती होत असते तुळस आणि शालीग्रामाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होऊन, व्यवहारिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात असे सांगितले जाते याप्रसंगी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली व सर्वानी महाप्रसादाचा लाभ घेतला.
0 टिप्पण्या