Advertisement

दखणे हायस्कुल चा शालेय खो-खो स्पर्धेत दबदबा कायम

दखणे हायस्कुल चा शालेय खो-खो स्पर्धेत दबदबा कायम

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत बळीराम दखने हायस्कुल कन्हान च्या विद्यार्थी खेळाडुंनी खो-खो वयोगट १७ मुले व वयोगट १४ मुले स्पर्धेत विजय प्राप्त केला. वयोगट १७ मुली च्या स्पर्धेत तालुक्यातुन विजय प्राप्त करून जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे . तसेच १४ वयोगटात कुस्ती स्पर्धेत कु. प्रियंका कोठेकर हीने विजय प्राप्त करून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे .

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागा च्या विद्यमाने तथा जिल्हा क्रिडा अधिकारी व जिल्हा क्रिडा परिषद च्या वतीने सन २०२२-२३ या सत्रातील शालेय तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा पारशिवनी येथील हरिहर विद्यालय पारशिवनी येथे आयोजित करण्यात आल्या असुन यात शालेय खो-खो स्पर्धेत बळीरामजी दखणे हायस्कुल कन्हान चे विद्यार्थी खेळाडु मुले १७ वयोगटात केसरीमल हायस्कुल व लालबहादुर शास्त्री विद्यालयाच्या संघा ला पछाडनी देत नेहमी प्रमाणे आपला दबदबा कायम ठेवला . मुले १४ वयोगटात अंतिम सामन्यात हरिअर विद्यालयाच्या संघावर विजय मिळवित बळीरामजी दखणे हायस्कुलने आपले वर्चस्व नेहमी प्रमाणे कायम ठेवले . तसेच मुली १७ वयोगटात ही दखणे हायस्कुलच्या मुलींनी बाजी मारून काटोल येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला आहे. त्याच बरोबर शालेय कुस्ती स्पर्धेत बळीराम दखणे हायस्कुल च्या मुली १४ वयो गटात प्रियंका कोठेकर ने बाजी मारून नागपुर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. बळीरामजी दखणे हायस्कुल च्या प्राचार्या सौ विशाखा ठमके मॅडम हयांनी सर्व विजयी खेळाडुंचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता खेळाडुंना व शाळेचे क्रिडा शिक्षक श्री माधव केवलरामजी काठोके सर यांना शुभेच्छा देऊन त्यांचे आभार व्यकत केले .

या स्पर्धेला उपस्थित असलेले शिक्षक श्री विलास सर, अमित थटेरे सर, श्री गवळी सर, सौ मोटघरे मॅडम, सौ कोहळे मॅडम, श्री गणवीर, श्री अनिकेत वैद्य, श्री निखिल हयांना शुभेच्छा देऊन सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या