भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही खानिवरेवाडीत रस्ताच नाही
मुरबाड: -भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही खानिवरेवाडीत रस्ताच नसल्याने आदिवासी बांधव चिंतेत पडले असून या निवडणुकीत 170 कुटूंबातील लोक जागा दाखवून दिल्या शिवाय रहाणार नाही अशी माहिती ग्रामस्थांनी पत्रकारांना दिली आहे. आदिवासी पाडा क्षेत्रात राहत असलेले अती दुर्मिळ भागात राहणारे आदिवासी, यांच्या कडे सरकारचा लक्ष आहे कि नाही, कि सरकारला भूलन पडली अशे दिसतय.
तालुक्यातील म्हसा यात्रा म्हणून प्रसिद्ध असून म्हसा पासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या खानिवरे ग्रामपंचायत मध्ये खानिवरेवाडी असून या वाडीत महीला सरपंच माधवी सावंत या आहेत त्यांचे म्हणणे आहे की भारत स्वतंत्र होऊन ही आदिवासी लोक आपले जीवन रस्ता आभावि जगत असून आमच्या आजोबांनी पजोबा यांनी जिवन जगले पण आम्ही नविन पिढी पण हेच जिवन जगत असून आमच्या जगण्याला काहीच अर्थ नाही. हा रस्ता..! मी सरपंच आहे तोपर्यंत झाले नाही तर येत्या काही दिवसांत म्हसा धसई रस्त्यावर उग्र आंदोलन करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले आहे या 35 कुटुंब 170 लोकसंख्या असूनही शाळेतील विद्यार्थ्यांना शेताच्या बांधावरुन आजही जायला-येयला लागतं आहे ही एक दुःखाची गोष्ट आजही सतवत आहे.
सरपंच माधवी सावंत यांनी सांगितले की हा रस्ता लवकर तयार करण्यासाठी मी अनेक वेळा खानिवरे ग्रामपंचायत मध्ये तक्रार केली आहे पण यांची दखल कोणी ही गावकरी घेत नाही.
राजेश भांगे मुरबाड-ठाणे
0 टिप्पण्या