भाजपा द्वारे शहिदांना दिली श्रद्धांजली
कन्हान प्रतिनिधि -ॠषभ बावनकर
कन्हान – २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या नागरिकांना व वीर जवानंना भाजपा पदाधिकार्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी व सदस्यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या नागरिकांना व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली .
या प्रसंगी भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , कामेश्वर शर्मा , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका सुषमा चोपकर , वर्षा लोंढे , तुलेषा नानवटकर , सुनिल लाडेकर , संजय रंगारी , अमोल साकोरे , महेंद्र चव्हान अजय लोंढे , रिंकेश चवरे , शैलेश शैळके , मयुर माटे , दिपनकर गजभिये , माधव वैद्य सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .


0 टिप्पण्या