Advertisement

बिल्डिंग-पेंटर-बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ च्या वतींने अकोला येथे एकदिवसीय धरणे आंदोलन

बिल्डिंग, पेंटर बांधकाम इतर असंघटित मजूर संघ च्या वतींने अकोला येथे एकदिवसीय धरणे आंदोलन

बिल्डिंग, पेंटर बांधकाम इतर असंघटित मजूर संघ च्या वतींने आज असंघटित कामगारांच्या विविध मागण्यासाठी केले एकदिवसीय धरणे आंदोलन

अकोला :- बिल्डिंग, पेंटर बांधकाम इतर असंघटित मजूर संघ च्या वतींने अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली आज नोंदणी झालेल्या १८ वर्षा पुढील कामगारांना योजना क्रमांक १७ नुसार वयाची अट रद्द करून कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबातील वारसाला ५,००,०००/- रूपये देण्यात यावे, कर्मचाऱ्यांची मंडळामध्ये नव्याने भरती करण्यात यावी, . तीन वर्षात कामगारांना मंडळाकडून रूपये ५,०००/- देत असतांना ते मागील ४ वर्षापासून बंद असून ते सुरू करण्यात यावे . किंवा दरवर्षी बोनस म्हणून रु.२०,०००/- देण्यात यावे मृत्यु पावलेल्या कामगारांच्या वारसांना वार्षिक लाभ देण्यात यावे. विविध गंभीर आजाराने सापडलेल्या कामगारांना उपचारासाठी केलेले अर्ज लवकर निकाली काढण्यात यावे. ऑनलाईन नोंदणी किंवा नुतनीकरण झाले किंवा नाही यांचे संदेश (मॅसेज) कामगारांना देण्यात यावे. ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी मार्फत दिल्या जाणाऱ्या ९० दिवसाचे प्रमाणपत्रावर सहानिशा करूनच कामगारांना देण्यात यावे. जिथे बांधकामाचे साईट सुरू असतील तेथेच कामगारांची नोंदणी व नुतनीकरण करण्यात यावी. मध्यान्ह भोजन योजना बंद करून त्या बदल्यात कामकारांच्या बँक खात्यात प्रतिदिवस १२०/रूपये प्रमाणे रक्कम जम करण्यात यावी.आदी मागण्यांसाठी

आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले गेले आहे

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळांतर्गत विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत यामध्ये शैक्षणिक लाभ, ,आथिर्क लाभ व इतर लाभ मंडळातर्फे देण्यात येतात. मात्र बांधकाम कामगारांना वितरीत केलेल्या सुरक्षा संच (पेटी) व बाजारातील किंमत आणि कंत्राटदारांनी दिलेल्या देयकाची किंमत यात मोठी तफावत आहे, घर बांधण्याकरीता प्रत्येकी दोन लाख रूपये मंडळाने जाहिर केलेले आहे. या ४ वर्षात एकही कामगारांना घर बांधणीचा लाभ मिळाला नाही. दिवाळीत मंडळातर्फे कामगारांना बोनसची घोषणा झाली. परंतु १ रूपया सुद्धा कामगारांना मंडळाकडून मिळाला नाही. घोषणा करतात व जाहीरातीवर कोटी रूपये खर्च करून प्रत्यक्षात कामगारांना उपेक्षितच ठेवण्याचा मनसुबा असण्याचे स्पष्ट दिसत आहे ? खरेतर दरवर्षी कोट्यवधी रूपये मंडळात जमा होत असुन कामगारांना व त्यांच्या पाल्यांना त्याचा लाभा व्हावा हा उद्देश शासनाचा आहे प्रत्यक्षात तसे होतांना दिसत नाही. मंडळाच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे बसरेच अर्ज प्रलंबीत आहे. मंडळाने संपूर्ण महाराष्ट्रात कर्मचाऱ्याची संख्या वाढवून नवीन कर्मचाऱ्यांची भरती करावी. जेणेकरून नविन नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज व इतर लाभ बांधकाम कामगारांना लवकरात लवकर मिळतील. संघटनेच्या माध्यमातून लढा लढत असतांना प्रत्येक वेळी फक्त निवेदन घेतल्या जाते. पण पुढे।याचे फलीत होतांना दिसत नाही. मागण्यावर लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय धरणे देवून तमाम कष्टकरी बांधकाम कामगार हा

 

मंडळाकडे आशा लावून बघत आहे.

 

आज केलेल्या धरणे आंदोलनात अध्यक्ष प्रशांत मेश्राम, उपाध्यक्ष अब्दुल बशीर, महासचिव विनोद जपसरे, कोषाध्यक्ष- आत्माराम साठे, सहसचिव मनोज बाविस्कर, केंद्रीय सदस्य अब्दुल जमीर, व युवराज खडसे, संघटक सुरेश करंडे, प्र. प्रमुख गणेश सावळे, अकोला ता. अध्यक्ष सुनील शेगोकार, अकोला पूर्व- सचिन खराटे, ता. उपाध्यक्ष राजेंद्र मेहसरे, संजय इंगळे, महादेव शेगोकार, महानगर अध्यक्ष – सै. मकसूद, सचिव- दिपेश राउत, उपाध्यक्ष झिन्गाजी पुंडगे, तेल्हार गोपाल खोपाले, अविनाश वानखडे, शाम सोनोने, शे. अकरम, सिद्धार्थ तेलगोटे, संघटक संजय गवई, सचिन बालप, आनंद उके, सिद्धार्थ तायडे, बंडू पळसपगार, अजीमोद्दिन मिस्त्री, शेख सलीम, बशीर भाई, सुभाष तायडे, दीपक गीते, संतोष भालेराव, मनोज इंगळे, संतोष लबडे, दुर्गेश मळोकार, ता. उपाध्यक्ष हरिदास अघडते, सचिव प्रकाश शेंडे, संघटक- सिद्धार्थ तेलमोरे, शेख नईम, प्रकाश बोरकर, अनिल आमोदे, प्रकाश ओहेकर, राहुल लिंघोट, सचिन पुरी, नंदू घावट, ज्ञानू दांडगे, आदर्श घावत, रुपेश वसु, प्रकाश आठवले, अमित भदे, आशिष फुकट, अभिजित इंगोले, दाभाडे मिस्त्री, गणेश दामोदर, प्रकाश आठवले, बाबा कांबळे, गजानन बनसोड, अनिल वाघ, किशोर विश्वकर्मा, सलीम खां, मजहर शाह, दीपक गायकवाड, अमान खां, सुनील अवचारे, रुपेश थूल, शीख गुफरान, पिंटू तायडे, सागर मोहकर, तुषार शेगोकर, धनंजय शेगोकार, बाळू ढोकणे, महादेव झामरे, वाल्मिक बोम्बार्डे, योगेश आठवले, शशांक बोरकर, किशोर अडूळकर, सिद्धार्थ तायडे, संतोष लबडे, रवींद्र दामोदर, राम्कुर्ण चिमणकर, शे राहील शे आदिल, जानराव चिमणकर, शे. अजीम शे. अजीज, विनोद चावरे, संजय कटोरे, सुनील भालेराव, राहुल धांडे, अब्दुल गफ्फार, मो. सलीम, जितु वर्मा..आदींचा समावेश होता.

news ब्युरो अकोला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या