Advertisement

कन्हान ला बिरसा मुंडा यांच्या जयंती चे औचित्य साधुन जनजातीय गौरव दिवस थाटात साजरा

कन्हान ला बिरसा मुंडा यांच्या जयंती चे औचित्य साधुन जनजातीय गौरव दिवस थाटात साजरा

गोंडवाना संघर्ष समिति व कन्हान शहर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे गोंडवाना संघर्ष समिति व कन्हान शहर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजाचे जननायक क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जनजातीय गौरव दिवस म्हणुन थाटात साजरी करण्यात आली .

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कन्हान – पिपरी नगर परिषद माजी नगरसेविका राखी परते , बंडुजी ईडपाते , शहर विकास मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व दीप प्रज्वलन करुन , आणि केक कापुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी माजी नगरसेविका राखी परते , सोनु मसराम , शहर विकास मंच सचिव सुरज वरखडे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन चिरित्र्यावर प्रकाश टाकुन उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले आणि परिसरात बुंदी वितरण करुन बिरसा मुंडा यांची जयंती जनजातीय गौरव दिवस म्हणुन मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली .

कार्यक्रमाचे सुत्र संचालन संदीप परते यांनी केले तर आभार शंकर इवनाते यांनी मानले .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सहसचिव प्रकाश कुर्वे , कोषाध्यक्ष प्रणय बावनकुळे , पप्पू धाटे , अनिल पंधराम , पंचम सलामे , मनिष सिन्हा , रंजनिश मेश्राम , अभिजीत चांदुरकर , राजेश फुलझले , हरीओम प्रकाश नारायण , शाहरुख खान , आकाश पंडितकर , युवा पत्रकार रोहित मानवटकर , नितिन मेश्राम , प्रमीला मडावी , सारिका उके , सरोज मरोसकोल्हे , सोनी परतेकी , केसर सिरशाम , पिंकी टेकाम , रुपलता सलामे , अनुशिया टेकाम , प्रिया टेकाम , फलक मडावी , चंद्रकला भेलावे , गौरी ताई , बेबी ताई , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या