खदान नं ६ सब एरिया ऑफिस जवळुन किरलोस्कर कंपनीचा बंद पडलेला जनरेटर चोरी
फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नं ६ सब एरिया ऑफिस जवळुन किरलोस्कर कंपनीचा बंद पडलेला जनरेटर कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी नरेश बोधकर यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती फिर्यादी नरेश विश्वनाथ बोधकर वय ५४ वर्ष रा.यादव नगर नागपुर यांचे बीएसएनएल कंपनीचे टॉवर खदान नं ०६ येथील पुराने सब एरिया ऑफिस जवळ टॉवर लावलेले असुन त्याचे देखभाल दोन वर्षा पासुन नरेश बोधकर हे पाहत आहे. तेथे टावरचे देखभाल करिता कंपनीने महिला शक्ती उद्योग कंपनीचा सेक्युरीटी गार्ड प्रकाश बागडे रा.वाघधरे वाडी कन्हान हे रात्रीला काम पाहत होते. त्याच्या कंपनी बंद झाल्याने दिड महिन्या पासुन तिथे कोणी सिक्युरीटी नाही . शुक्रवार दि.२६ नोव्हेंबर रोजी १०.०० वाजता च्या दरम्यान सेक्युरिटी कर्मचारी प्रकाश बागडे यानी नरेश बोधकर यांना सांगितले की “मी काल पासून बीएसएनएल चे खदान न ६ येथे गार्ड ड्यूटी करिता गेलो तर टावरचे बाजुला बंद पडलेले जनरेटर चोरीला गेले आहे .”
असे सांगितल्याने नरेश बोधकर यांनी घटनास्थळी जाऊण पाहणी केली असता किरलोस्कर कंपनीचे बंद पडलेले जनरेटर दिसुन आले नसुन कोणीतरी अज्ञात चोराने किरलोस्कर कंपनीचा बंद पडलेला जनरेटर अंदाजे किंमत १५,००० रुपये अज्ञात चोराने चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी नरेश बोधकर यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक हद्यनारायण यादव यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .
0 टिप्पण्या