Advertisement

सुरगाणा महाविद्यालयात जागतिक महिला हिंसाचार प्रतिबंधक दिन साजरा

सुरगाणा  महाविद्यालयात जागतिक महिला हिंसाचार प्रतिबंधक  दिन साजरा

सुरगाणा:-  महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सुरगाणा येथे दिनांक 25-11-22 रोजी विशाखा समितीतर्फे ‘जागतिक महिला हिंसाचार प्रतिबंधक दिवसा’ निमित्त‌ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती योगिता चव्हाण उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. जी. दिघावकर  होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आपल्या मनोगतात ‘जागतिक महिला हिंसाचार प्रतिबंधक दिवसा’ निमित्त नेहमीप्रमाणे जगभरात अनेक ठिकाणी मोर्चे निघतील, काही चर्चासत्र, परिसंवाद रंगतील. पण हे सगळं जिच्यासाठी सुरू आहे ती स्त्री मात्र घरात, रस्त्यावर, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्या शरीराच्या आरपार जाणाऱ्या नकोशा नजरा, स्पर्श सहन करतच असेल. स्वतचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मारहाण करणाऱ्या पुरुषाविरुद्ध मूग गिळून बसलेली असेल. काही जणी अन्यायाविरुद्ध तोंड उघडायचा प्रयत्न करतील पण त्यांचे आवाज बंद केले जातील, हे सगळं बदलणार कधी हाच खरा प्रश्न आहे. जेव्हा तिला माणूस म्हणून स्वीकारलं जाईल तेव्हा मानवी अधिकार दिन किंवा स्त्री अत्याचार प्रतिबंध दिवस अशा दिवसांची कधीही गरज पडणार नाही असे प्रतिपादन केले .त्याचबरोबर स्त्री ही आपली आई, बायको, मुलगी, बहीण, मैत्रीण, सहकारी किंवा अजून कोणी असू शकते, तिच्याकडे या सगळ्या नात्यांच्या पलीकडे जाऊन तिला माणूस म्हणून स्वीकारले जाण्याची गरज आहे. स्त्रियांचे सबलीकरण होणे म्हणजे तिचे व्यक्तिमत्त्व एक माणूस म्हणून विकसित करायचे व कोणत्याही भेदभावाशिवाय प्रगती करण्याची संधी मिळायला हवी. महिलांचा सहभाग, त्यांना संरक्षण, त्यांची आर्थिक उन्नती, त्यांच्या क्षमतांचे संवर्धन आणि या सर्वांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती गरजेची आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कविता भोये यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सचिन पिठे यांनी केले. आभार प्रा. कविता कडवा यांनी मानले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्ही.डी अहिरे, शैक्षणिक सुपरवायझर प्रा.एस.एम. भोये  तसेच  महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वृंद महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या