शेतातील गोठ्यात बांधलेली २ गाई व १ गोरा कोणीतरी अज्ञात चोरट्यांने केले चोरी
फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गहुहिवरा शिवार येथील जयप्रकाश बुरूगपल्ली यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेली २ गाई व १ गोरा कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरी करुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात चोरट्यान विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार दि ३ नोव्हेंबर ला सायंकाळी ७ वाजता च्या सुमारास फिर्यादी जयप्रकाश मोसीरत्नम बुरूगपल्ली वय ३२ वर्ष रा. गहुहिवरा , कन्हान यांनी नेहमी प्रमाणे ३ गाई , ४ वासरू आणि २ मशी शेतातील गोठ्यात बांधून घरी गेले होते . दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.४ नोव्हेंबर ला सकाळी ५:३० वाजता च्या सुमारास जयप्रकाश बुरूगपल्ली हे आपल्या शेतात गाई चे दूध काढण्यासाठी गेले असता ३ गाई ४ वासरु आणि २ मशी पैकी १) एक पांढऱ्या रंगाची गाय किंमत १०,००० रु. २) एक लाल रंगाची गाय किंमत १०,००० रु. ३) एक गोरा किंमत ५,००० रु असा एकूण २५,००० रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी जयप्रकाश बुरूगपल्ली यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात चोरट्या विरुद्ध अप क्र ६२५/२२ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .


0 टिप्पण्या