Advertisement

नागभीड येथे माणुसकीची भिंत उपक्रमाची सुरुवात.

नागभीड येथे माणुसकीची भिंत उपक्रमाची सुरुवात

नागभिड :-पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात अविरत कार्यरत नागभीड येथील झेप निसर्गमित्र संस्थे च्या वतीने नको असल्यास आणून द्या,हवे असल्यास घेऊन जा या माध्यमातून माणुसकीची भिंती हा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षी सुद्धा या उपक्रमाची सुरवात नागभीडचे जेष्ठ साहित्यिक माजी प्राचार्य गोविंदराव वारजुरकर महाविद्यालय चे डॉ.राजनजी जयस्वाल सर यांच्या हस्ते गरजू व्यक्तीला कपडे देऊन करण्यात आली.

यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे,गुलजारजी धम्मानी व्यापारी संघटना अध्यक्ष नागभीड,उमाजी हिरे माजी नगराध्यक्ष, मोहनजी जगनाडे सेवा निवृत्त प्राध्यापक,गणपतजी देशमुख प्राचार्य महात्मा गांधी महाविद्यालय,गणेशजी तर्वेकर माजी उपनगराध्यक्ष,डॉ. पवन नागरे,अध्यक्ष झेप संस्था नागभीड,अजय काबरा माजी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ,ऍड रवजी चौधरी बार काँसिल अध्यक्ष,ऍड घुटके साहेब,प्रमोदजी तर्वेकर उद्योजक,वासुदेव भुते राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव,विजयजी बंडावर सचिव व्यापारी संघटना,परागजी भणारकर शिक्षक सरस्वती ज्ञान मंदिर, सचिव अमितजी देशमुख झेप संस्था,उपाध्यक्ष अमोलजी वानखेडे,सहसचिव पंकजजी गरफडे, सदस्य ओमप्रकाशजी मेश्राम,सतिशजी मेश्राम,आशिष कुंभरे,चेतन भोयर,विरु गजभे, अमोलजी रेवस्कर,क्षितिज गरमळे,गुलाब राऊत, करण मुलमुले, तुषार गजभे, सलिम शेख,घृनेश्वरजी बोरकर,रितेश कोरे,पवन फुकट,अक्षय जीवतोडे,जितेंद्र श्यामकुळे, प्रितम रगडे, मिलिंद ठाकरे आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाला खुप मोठया संख्येने नागभीडकरांची उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या